संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 

शिक्षणमंत्री ना.भुसे यांच्या कार्यक्रमापूर्वी शिक्षकांचा प्रताप 

संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 

आधुनिक केसरी न्यूज

देऊळगाव राजा : शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना तालुक्यातील शिनगाव जहागीर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या हातात झाडू देऊन त्यांच्याकडून शाळेची स्वच्छता करून घेण्याचा प्रताप समोर आला आहे. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

 उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज २३ जुन रोजी विदर्भातील शाळांचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ ची सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत  देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील जि.प प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभा द्वारे प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा परिसर स्वच्छता करणे, कचरा उचलणे या कामाला लावले.एवढेच नव्हे तर चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पाणी बॉटल चे कॅरेट सुद्धा उचलून घेण्याचे काम करवून घेण्यात आले.एकीकडे विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणुन साजरा करावा, त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे असे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले असताना सिनगाव जहागीर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मंत्री यांच्या कार्यक्रमा च्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांकडूनच स्वच्छता करून घेण्या चा प्रताप जिल्हा परिषद शिक्षकांकडून  घडला आहे.
* गावातील एका शाळेतील विद्यार्थिनींना कार्यक्रमासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्याची विनंती जिल्हा परिषद शाळे मार्फत करण्यात आली होती. यादरम्यान रांगोळी काढण्यासाठी त्यांच्यातील एखाद्या मुलीने जि.प शाळेतील विद्यार्थ्यांना रांगोळी साठी आवश्यक तेवढी जागा स्वच्छ करण्याचे सांगितले असेल. विद्यार्थी स्वच्छता करीत असताना शाळेतील शिक्षक तिथे उपस्थित नव्हते.
* दादासाहेब मुसदवाले गटशिक्षणाधिकारी पं.स देऊळगाव राजा

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका