काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा राजीनामा..!

काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा राजीनामा..!

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : वरोडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी आपल्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यात खळबळ माजली असून त्यांचा राजीनामा हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.विलास टिपले हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांचे ते समर्थक होते. संजय देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते मात्र काँग्रेसची पक्षाशी एकनिष्ठ राहिले व पक्षासाठी आपले योगदान देत राहिले. त्यामुळे ते शहर काँग्रेस अध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकले. दरम्यान ते वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही निवडल्या गेले होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यात विकासात्मक कामावर भर दिला होता. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दोन महिन्यापूर्वीच दिला होता.मात्र 22 जून रोज रविवारला समाज माध्यमावर आलेल्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण आले. विधानसभा निवडणुकीनंतर आपणास कार्यातून मुक्त करण्यात यावे अशी सूचना त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.मात्र विलास टिपले यांनी राजीनामा का दिला हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू  संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना तालुक्यातील शिनगाव जहागीर जिल्हा...
जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके
शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी
यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा : सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचे निर्देश
काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा राजीनामा..!
आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचा वीज वितरण कंपनीला इशारा
महारुद्र विकास पॅनल चा दणदणीत विजय..!