जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके

जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई, दि. २३ : केंद्र शासनामार्फत भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘जनजाती गौरव वर्ष’ म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. देशाच्या आदिवासी समाजाच्या गौरवशाली वारशाला वंदन करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. वर्षभर आयोजित विविध उपक्रमात राज्यातील  युवक-युवतींचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके  यांनी सांगितले.मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजनाबाबत  सह्याद्री अतिथिगृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

  या कार्यशाळेस वनवासी विकास समितीचे  कार्यप्रमुख वैभव सुरंगे, अनिल पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.मंत्री डॉ. वुईके म्हणाले, जनजातीय समाजाचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांचा जन्म जनजातीय समाजात झाला याचा आपल्याला अभिमान आहे. जनजातीय समाजाने आपल्याला निसर्गसंवर्धनाचा मार्ग दाखवला आहे, जो आजही अनुकरणीय आहे. केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान' आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' अंतर्गत आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाभरात १५ ते ३० जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने जनजातीय गौरव वर्ष २०२५ चा भाग म्हणून शेवटच्या घटकापर्यतच्या आदिवासी समुदायांना विविध सेवा देण्यासाठी  शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले. श्री. सुरंगे आणि श्री. पाटील यांनी स्वातंत्र्य संग्रामातील जनजातीय समाजाच्या योगदानाबाबत मनोगत व्यक्त केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू  संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना तालुक्यातील शिनगाव जहागीर जिल्हा...
जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके
शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी
यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा : सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचे निर्देश
काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा राजीनामा..!
आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचा वीज वितरण कंपनीला इशारा
महारुद्र विकास पॅनल चा दणदणीत विजय..!