दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..!

दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..!

आधुनिक केसरी न्यूज

वसमत : स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी फ्लिपकार्ट पार्सल वाहन महामार्गावर अडवुन दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्याची मोहीम फत्ते केली आहे. दि.११/०६/२०२५ रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान पो.स्टे. कुरूंदा हद्दीतील भेंडेगाव पाटी रेल्वे गेट जवळ फ्लिपकार्ट पार्सल घेवुन जाणारे कंटेनर समोर कार आडवी लावुन लोखंडी रॉडने कंटेनरचे काचा फोडुन चालक अजय देविदास गायकवाड, वय ३४ वर्ष व क्लिनर वैभव गणेश शिनगारे, वय २० वर्ष, दोन्ही रा. बहादरपुरा, ता. कंधार, जि. नांदेड या दोघांना मारहाण करून सदरचे कंटेनर महामार्गावरून आडमार्गाला नेवुन लुटमार केल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयासंदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देवुन सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्याबाबत पो. नि. श्री. विकास पाटील, स्था. गु.शा. हिंगोली यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथक समांतर तपास करीत होते.

पोलीस पथकाने अनेक बाबींचा सखोल तपास करून गोपनिय बातमीदार व तांत्रिक बाबींचा अभ्यास केला, त्यावरून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा दरोडा, खंडणी सारखे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १) ज्ञानेश्वर प्रकाश खानजोडे, वय ३२ वर्ष, रा. निजामपुर, ता. रिसोड, जि. वाशिम, २) परमेश्वर ज्ञानबा चौधरी, वय २५ वर्ष, रा. निजामपुर, ता. रिसोड, ३) शंकर दत्तराव काळे, वय ३२ वर्ष, रा. घोणसर, ता. रिसोड, ४) मंगेश नारायण काटे, वय २९ वर्ष, रा. बेंदरवाडी, रिसोड, ५) मो. युसुफ मो. ख्वाजा, वय २८ वर्ष, रा. मुल्लागल्ली, रिसोड, ६) अभिषेक गजानन हलगे, वय २२ वर्ष, रा. आसनगल्ली, रिसोड, ७) सर्वेश कैलास धुत, वय २५ वर्ष, रा. शिवाजी कॉलनी, रिसोड, ८) नागनाथ रामराव राऊत, वय ४२ वर्ष, रा. नेरली, ता. जि. नांदेड, ९) अमर इंगोले, रा. वडारवाडा, रिसोड, १०) मारोती भुताडे, रा. खानापुर, ता. देगलुर, जि. नांदेड यांनी कट रचुन केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने आरोपी क्र. १ ते ८ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आरोपी क्र. १ ते ६ व ९ यांनी फ्लिपकार्ट कंपणीचे पार्सल वाहन चालक नागनाथ राऊत व मारोती भुताडे यांचे सांगणेवरून व फ्लिपकार्ट कंपणीचा रिसोडचा यापुर्वीचा मॅनेजर सर्वेश धुत याच्या नियोजनाप्रमाणे आरोपी क्र. १ ते ६ व ९ यांनी दरोडा टाकुन वाहनातील ७,७७,०००/- रूपयाचा फ्लिपकार्ट पार्सल सामान व चालक व क्लिनर याचे ०२ मोबाईल असा एकण ७,९५,७११/- रूपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्याचे सांगीतल्यावरून आरोपी क्र. १ ते ८ यांना ताब्यात घेवुन उपरोक्त चोरलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले पिकअप क्र. एमएच २६ बी.ई २३८२ व गुन्हयात वापरलेली स्विफ्ट डिजायर कार एमएच २७ बी.ई. ४१९५ असा एकुण २२,००,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून महामार्गावरील दरोडयाचा गुन्हा उघड केला आहे.्
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, श्री. राजकुमार केंद्रे, उपविपोअ. वसमत, पो.नि. श्री विकास पाटील, स्था. गु. शा. हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री. शिवसांब घेवारे, पोउपनि विक्रम विटुबोने, पोउपनि. दिलीप मोरे, स्था. गु. शा. हिंगोली व सपोनि. राम निरदोडे, पोउपनि . प्रविण आगलावे, पो.स्टे. कुरूंदा, सपोनि. गजानन बोराटे, पो.स्टे. वसमत ग्रामीण, पोलीस अंमलदार प्रेम चव्हाण, पांडुरंग राठोड, नितिन गोरे, लिंबाजी वाळुळे, गजानन पोकळे, दत्ता नागरे, प्रदिप झुंगरे, मारोती काकडे, प्रणिता मोरे, इरफान पठाण, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, निरंजन नलवार, शिवाजी इंगोले, विशाल खंडागळे, किशोर सावंत, सतीष जाधव, शेख जावेद, रवि मिनाजगी यांनी केली आहे. तसेच पो. नि. रामेश्वर चव्हाण, पो.स्टे. रिसोड यांचे पथकाने आरोपी पकडण्याची महत्वाची मदत केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाने दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..! दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वसमत : स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी फ्लिपकार्ट पार्सल वाहन महामार्गावर अडवुन दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद...
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण
पतंजली योग जिल्हा सहप्रभारी पदी अविनाश गायकवाड यांची निवड..!
"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
ब्रेकिंग... नागभीड ब्रम्हपुरी मार्गावर उद्या मेगा 15 जून ब्लॉक
बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले