चक्रीवादळामुळे चाळीसगाव तालुक्यात केळींच्या बागांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी हवालदिल
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : काल दिनांक 11 जून बुधवारी रात्री झालेल्या चक्री वादळाच्या तडाख्याने चाळीसगाव तालुक्यातील अनेक भागात पाऊस व जोरदार चक्री वादळामुळे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द या परिसरात ही झोड अधिक प्रमाणात जाणवली आहे. वाडे येथील शेतकरी विजय धर्मा महाजन यांचे टेकवाडे खुर्द परिसरात असलेले गट नंबर 61/1 व सौ कल्पना विजय महाजन यांचे गट ऩं 61/2 या शेतातील निसवण झालेले दोन तीन हजार केळीचे झाडे चक्री वादळामुळे मुळासकट उन्मळून पडली असून घड काढण्यापूर्वी जमिनीवर आल्याने आठ-दहा लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात निराशा आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. विजय धर्मा महाजन व कल्पना विजय महाजन यांनी जवळपास तीन एकर क्षेत्रावर केळी लागवड केली होती. उत्पादनाची मोठी अपेक्षा होती. पण वादळाने उध्वस्त केले आहे .शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आव्हान नुकसानग्रस्त शेतकरी विजय महाजन व कल्पना महाजन यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List