चंद्रपूरातील रामनगर पोलीसांनी ४१ गोवंशांना दिले जीवदान

कत्तलीच्या उद्देशाने गोवंश कब्जात बाळगणा-या ०३ आरोपींवर गुन्हे दाखल.

चंद्रपूरातील रामनगर पोलीसांनी ४१ गोवंशांना दिले जीवदान

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : शहरात कत्तलीच्या उद्देशाने अवैद्यरिता गोवंश आणले असून त्यांची कत्तल केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी असिफराजा शेख यांना देऊन योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांनी पोलीस स्टेशन रामनगरचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैद्यरिता कत्तलीच्या उद्देशाने कब्जात बाळगून ठेवलेल्या गोवंशांची सुटका करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढून रामनगर पो.स्टे. हद्दीतील तुकुम तलाव परिसरातील अब्दुल सलीम अब्दुल सत्तार, वय- ४१ वर्षे रा. उस्मानीया मस्जीद जवळ, तुकुम तलाव, चंद्रपूर याचे गोडावूनवर छापा घालून त्याचे कब्जातून ७ गोवंश ताब्यात घेतले. त्यानंतर मोहम्मद साबीर ईस्माईल कुरेशी, वय-४५ वर्षे, रा. रहेमतनगर, हुद्दा मस्जीदजवळ, चंद्रपूर याचे राहते घरी छापा घालून त्याचे स्लॅबच्या घरातील दुस-या माळ्यावर कत्तलीसाठी बांधून ठेवलेले २७ गोवंशांची सुटका करून कारवाई केली. तसेच शेख जलील शेख कादर वय-७० वर्षे, रा. रहेमतनगर, चंद्रपूर यांचे राहते घराजवळून ०७ गोवंशांची सुटका करून एकूण तीन ठिकाणी छापा घालून एकूण ३,०५,०००/- रूपये किंमतीच्या ४१ गोवंशांची सुटका करून आरोपींवर ०३ गुन्हे दाखल करून सर्व जनावरे देखभालीसाठी प्यार फाऊंडेशन, छोटा नागरपूर, पडोली येथे जमा केली आहेत.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व  उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार मनिषा मोरे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, सचिन गुरनुले, लालू यादव, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे अशांनी केली आहे. 
चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईमुळे वंशाची तस्करी करणाऱ्यांना चांगलाच धाक बसला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूरातील रामनगर पोलीसांनी ४१ गोवंशांना दिले जीवदान चंद्रपूरातील रामनगर पोलीसांनी ४१ गोवंशांना दिले जीवदान
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : शहरात कत्तलीच्या उद्देशाने अवैद्यरिता गोवंश आणले असून त्यांची कत्तल केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मा....
अम्मा की पढाई –विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम :आ.किशोर जोरगेवार
अखेर आदिवासी समाजाची प्रतीक्षा संपली,समाजाच्या न्यायासाठी सरकारचे निर्णायक पाऊल..!
दिक्षा वानखडे-शेगोकार यांना वाणिज्य विषयात पीएच.डी पदवी प्रदान
हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा 12 तासांत सुगम शोध; तेलंगणामधून सुरक्षित परतवला
आवाज केला तर जिवे मारुन टाकु अशी धमकी देत बंदुकीचा धाक दाखवत ७ लाख लुटले; एक जण गंभीर जखमी..!
‘विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस