धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं केलं जप्त; जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रशेखर अहिरराव
धुळे : कृषी विभागाच्या वतीने आज गुजरात हून येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयाचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आलं. वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास 20 लाख रुपयांचं बनावट बियाणं व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणं जप्त करण्यात आलं.
जवळपास या कारवाईमध्ये बाराशे ते तेराशे बनावट कपाशीचे बियाणं जप्त करण्यात आले.ही सर्व बियाणं गुजरात मधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती.अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती तर पीनगार्ड,राशी 659 5g अशी बनावट पाकीट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे.यात धुळे जिल्हा गुण नियंत्रक कृषी अधिकारी अरुण तायडे व मनोज शिसोदे यांचा आधीपत्या खाली सदर कारवाई करण्यात आली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List