पाणीपुरवठा विभागाची दमदार कामगिरी; पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनीची गळती : केवळ ६ तासात पाणीपुरवठा पूर्ववत
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : मिरजेतील कमान वेस पासून मनोज शिंदे घर या रस्त्यावर सध्या मिरजेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन हे सध्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाच्या दृष्टीने जेसीबी द्वारे खड्डे काढत आहेत काल सायंकाळी असाच एक खड्डा काढत असता पूर्व म्हाडा कॉलोनी आदर्श कॉलनी लोकमान्य कॉलोनी या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वहिनीला जेसीबी मुळे अचानक गळती लागली आणि मोठा कारंजा निर्माण झाला तातडीने पटवर्धन यांच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे पाणी पुरवठा निरीक्षक संतोष कुंभार याना कळवले कुंभार यांनी तात्काळ आपले कर्मचारी घेऊन घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर पाणीपुरवठा विभागातील शासकीय मान्यता प्राप्त कंत्राटदार मयूर खाडिलकर यांनाही दुरुस्तीसाठी पाचारण केले केवळ ६ तासांमध्ये हे लिकेज पाणीपुरवठा विभागाने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत केला. अधिकरी संतोष कुंभार आणि त्यांच्या टीम चे नागरिकांनी आभार मानले आणि समाधान व्यक्त केले
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List