कर्जाला कंटाळून नंदगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या..!
On
आधुनिक केसरी न्यूज
मुखेड : तालुक्यातील मौजे नांदगाव (प.क.) येथील युवा शेतकऱ्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २८ मे रोजी सकाळी घडली. मुखेड तालुक्यातील युवा शेतकरी नागनाथ नर्सिंग देवकते (३०) यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज घेतले होते. सदरील कर्जाची परतफेड करण्यासाठी यावर्षी बिन मोसमी जास्तीचा पाऊस होत असल्याने शेतातील कामे अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होईल व आपणास शेतातून उत्पन्न होणार नाही, त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे ? या चिंतेत नागनाथ सकाळी घरून शेतात जातो म्हणून निघाला होता. तो आपल्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
31 May 2025 13:08:29
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली : दि.३० मे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल...
Comment List