नकली सोन्याच्या गिन्या विकणारे दोघे अटक बारा हजारात ५ शिक्के विक्री नंतर गैरप्रकार उघडकीस..!
आधुनिक केसरी न्यूज
देऊळगाव राजा : अस्सल सोने असल्याचे भासवून १२ हजारात पाच गिन्या विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी आज (ता.२७) बसस्थानक परिसरातुन अटक केली. आरोपींता कडून पोलिसांनी ८५२ नकली सोन्याच्या गिन्या जप्त केल्या आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मोहित मनोजकुमार पांडेय (उत्तर प्रदेश ) या व्यक्तीस आरोपीतांनी १२ हजार रुपयात सोन्याच्या ५:गिनन्या (शिक्के ) विकत दिले. मात्र सदर शिक्के हे नकली आहे, आपली फसवणूक झाली अस्सल म्हणून बनावट सोन्याच्या गिनन्या देऊन आरोपींनी आपल्याला गंडविल्याचे लक्षात येताच मोहित पांडेय यांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान प्रभारी ठाणेदार आशिष रोही,यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भरत चिरडे यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस स्थानक परिसरातून दोघा आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून बनावट सोन्या च्या ८५२ गिनन्या जप्त करण्यात आल्या असून मोहित मनोजकुमार पांडेय वय २५ धंदा पेट्रोल पंप,राहणार पिंपरीपो. मैनासी सरैय्या ता.मिसरीक जि. सीतापुर (उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी देवानंद बबन पवार व विजय भोसले दोघे राहणार दुसरबीड तालुका सिंदखेड राजा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे. सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भरत चिरडे तपास करीत आहे. यापूर्वी सन २०२१ मध्ये देऊळगाव राजा पोलिसांनी नकली सोन्याच्या गिन्या विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक केली होती त्या प्रकरणात ही सदर आरोपींचा समावेश होता अशी माहिती पोलिस सूत्रां कडून प्राप्त झाली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List