CSMSS ची विद्यार्थीनी कु.संस्कृती सतीश शेळके राज्यातून पहिली
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण करून देणाऱ्या कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची विद्यार्थीनी कु. संस्कृती सतिश शेळके हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी दि. 21/06/2025 रोजी जाहीर केल्यानुसार हिवाळी-2023 विद्यापीठ परीक्षेत तृतीय वर्ष बीएएमएस परीक्षेत महाराष्ट्रातील 107 महाविद्यालयामधुन प्रथम क्रमांक घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच ती महाराष्ट्र राज्यातून पहिली आली आहे.
यापूर्वी कु. संस्कृती प्रथम वर्ष बीएएमएस उन्हाळी-2021 परीक्षेत महाराष्ट्रात 4 था क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.
गंगापूर येथील श्री. सतीश श्रीरंग शेळके यांची कन्या संस्कृती शेळके ही दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय शिक्षण घेऊन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिकमार्फत घेण्यात आलेल्या बीएएमएस तृतीय वर्षाच्या परीक्षेत १०५० पैकी ८३१ गुण मिळवून तिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला. संस्कृतीचे वडील श्री. सतीश श्रीरंग शेळके संगणक दुरुस्तीचे काम करतात, तर आई सौ. शीला शेळके या शिलाईचे काम करतात. प्रतिकूल परिस्थिती असताना संस्कृतीने हे यश मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव . श्रीपद्माकरराव मुळे, सदस्य, प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, उपप्राचार्य डॉ. जयश्री देशमुख तसेच अध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी कु. संस्कृती सतिश शेळकेचा सत्कार संस्थेचे सचिव श्री. पद्मकरराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. शशिकांत डिकले, एच. आर. श्री. अनिल तायडे तसेच जनसंपर्क अधिकारी श्री. सजंय अंबादास पाटील उपस्थित होते.
जिद्द, सातत्य, काहीतरी नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली म्हणून हे यश - कु. संस्कृती सतीश शेळके
सर्वप्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमध्ये महाराष्ट्रातून मला सर्वाधिक सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याचे सर्व श्रेय माझे आई, वडील व CSMSS आयुर्वेद महाविद्यालयाला देईन. कारण आज मी जे काही यश मिळवलं ते यांच्यामुळे. डॉ. श्रीकांत देशमुखसर आणि टीम यांनी जी जिद्द, सातत्य, काहीतरी नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली होती, खरे तर हेच माझे प्रेरणास्थान होते. त्याच्याकडून मी या गोष्टी शिकले. कोणती ही गोष्ट म्हणजे अकॅडेमिक, स्पोर्ट्स व योगा यामध्ये सर्वानी आम्हाला खूप मेहनत, सर्व तसेच मदत केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे.
कु.संस्कृती सतीश शेळके
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List