मांडवी वन विभागांतर्गत बिबट्या मृत्यू प्रकरणात सहाय्यक वनसंरक्षकावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय प्रतिकार दलाची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : तालुक्यातील सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्या वाघाचा मृत्यू झाला होता त्यानंतर घटनास्थळावरून वाघाचा मृतदेह गायब झाला वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोडून कर्तव्यात कसूर करणारे सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी व मांडवीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र पर्यावरण बचाव समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकाकडे केली आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षकाकडे केलेल्या तक्रारीत तलवारे यांनी म्हटले आहे की, वाघाच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत.वनपरिक्षेत्राअंतर्गत उन्हाळ्यात जलकुंभ उभारणी व इतर सोयीच्या अभावामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रस्त्यावर येतात परिणामी त्यांचा अपघात होतो किंवा शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकण्याची भीती असते.मांडवी वनपरिक्षेत्राची जबाबदारी असणारे सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाली आहे,होत आहे.
सारखणी घाटात वन तपासणी नाक्याच्या काही अंतरावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता.घटनेनंतर स्थानिक वनप्रेमी नागरिकांनी मोबाईलवरून अधिकाऱ्यांना माहिती कळविली होती परंतु संबंधित अधिकारी तीन तासांनंतर घटनास्थळी आले होते तोपर्यंत बिबट्याचा मृतदेह गायब झाला होता,या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कोणतीच मोहिम राबविण्यात आलीच नाही याउलट हे प्रकरण थंडच करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे वन्यप्राणी नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.बिबट्याचे शव कुठे गायब झाले याबाबत अन्याय प्रतिकार दल आणि अन्य संघटनेनी विचारणा केली होती परंतु त्यास अद्याप उत्तर देण्यात आले नाही.एकंदरीत सगळा अंदाधुंद कारभार वनखात्यात सुरू आहे.नांदेड चे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांचे आपल्या अधिपत्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे मुख्य वनसंरक्षकांनीच यात लक्ष घालावे व बिबट्याचा मृतदेह गायब प्रकरणांत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सिध्दार्थ तलवारे यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List