दादुलगाव येथे भिषण अपघात ; दोघे गंभीर जखमी,संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..!

दादुलगाव येथे भिषण अपघात ; दोघे गंभीर जखमी,संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..!

आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके 

जळगाव जा : दादुलगाव  येथे दुपारच्या वेळी  वडाच्या  झाडाखाली बसलेल्या दोघांना एम‌.एच  28 बी.बी.2860 क्रमांक असलेल्या टीपरने  उडवून दिल्याची घटना  22 में रोजी घडली.
  याबाबत सविस्तर वृत्त असे की,काशीनाथ झालटे वय 40 व समाधान काळे वय 55 दोघेही हनुमान  मंदीराच्या समोर रोड लगत असलेल्या वडाच्या झाडाखाली बसलेले असतांना मानेगाव वरून भरधाव वेगाने आलेल्या टिप्पर चालकाचे  वाहनावरील नियंत्रण  सुटल्याने वडाच्या  झाडाखाली असलेल्या दोघांनाही चीरडले.यामध्ये काशीनाथ झालटे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून समाधान काळे हे सुध्दा जखमी झाले आहे.अपघाताची  माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली असता गावातील संतप्त जमावाने सदर टिप्परला आग लावून पेटवून दिले.आगीत टीप्परचा पुढील भाग जळून नष्ट झाला. अपघातातील जखमिवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात येथे  उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती कळताच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार श्रीकांत निचळ आपल्या सहकाऱ्यांसोबत  घटनास्थळी दाखल झाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दादुलगाव येथे भिषण अपघात ; दोघे गंभीर जखमी,संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..! दादुलगाव येथे भिषण अपघात ; दोघे गंभीर जखमी,संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..!
आधुनिक केसरी न्यूज सागर झनके  जळगाव जा : दादुलगाव  येथे दुपारच्या वेळी  वडाच्या  झाडाखाली बसलेल्या दोघांना एम‌.एच  28 बी.बी.2860 क्रमांक...
धुळ्यातील विश्राम गृहात सापडले कोट्यावधींची घाबड..!
५ किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढत चंद्रपूरकरांनी केला भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम
कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश