धुळ्यातील विश्राम गृहात सापडले कोट्यावधींची घाबड..!
अंदाज समितीचे अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यक यांनी पैसे गोळा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रशेखर अहिरराव
धुळे : नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात दाखल झालं होत.धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती.अंदाज समितीच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्रुटी आढळून आल्यान अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्राम गृह या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता.आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्राम गृह येथे दुपार पासूनच पहारा देण्यात आला होता.दरम्यान यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांसह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला मात्र,एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे देखील अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितल असून स्वतः अनिल गोटे यांनी गेल्या तब्बल 5 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता.
दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्राम गृह या ठिकाणी रूम आरक्षित करण्यात आला होता.आणि याच ठिकाणी कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्या नंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्राम गृहाचे 102 रूम चे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्या नंतर त्या रूम मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड मिळून आली आहे. जवळ पास 3 मशीन द्वारे रात्री उशिरा पर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते.रात्र भर शासकीय विश्राम गृह बाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.अखेर इतके पैसे नेमके कुठून आले कुठून आणि कोणी दिले या बाबत आता पोलिस चौकशी करीत आहे.
धुळ्यात आलेल्या समिती मधील 11 आमदार यांची नावे
समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर,समिती सदस्य आमदार काशिराम पावरा,दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील,किरण सामंत, शेखर निकम,कैलास पाटील, सदाशिव खोत,राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List