जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला .पैठण येथील नाथसागर धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला . धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे . शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . विनयकुमार राठोड , उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरणाची पाहणी केली . यावेळी तहसीलदार दिनेश झांपले , पोलीस निरीक्षक व संजय देशमुख , नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ . पल्लवी अंभोरे उपस्थित होते . पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय काकडे यांनी धरणाच्या सुरक्षेची माहिती दिली . जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या . धरणावर यंत्रसामग्री व सायरन बसवण्याचे आदेश दिले . अनोळखी व्यक्ती व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. धरणावर नियुक्त कर्मचाऱ्यांची वर्दळ राहणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List