संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांवर डल्ला मारणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद.

टोळीकडून 23 तोळे सोने व 14 मोबाईल सह 23 लाख 91 हजारांचा मुद्देमाल  हस्तगत 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांवर डल्ला मारणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद.

आधुनिक केसरी न्यूज

 रोहित दळवी

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२५ मध्ये वारकरी व नागरिकांची दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे मोबाईल व चैन स्नैचिंगचे गुन्हे घडत असतात सदर गुन्हयांना प्रतिबंध होणेकरीता मा अपर पोलीस आयुक्त सो गुन्हे पुणे शहर यानी गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणुक केलेली होती त्याबाबत वरिष्ठांनी योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.
गुन्हे शाखा युनिट ०५ व ०६ या पथकाने पोलीस निरीक्षक बाहीद पठाण यांचेसह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे में कानिफनाथ कारखिले यांना मिळालेल्या बातमी वरुन अभिलेखावरील महिला आरोपी नामे १) चांदणी शक्ती कांबळे, वय ३२ वर्षे रा शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता उदगीर जि लातुर २) रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे, वय ३५ वर्षे, रा अंबिका कॉलनी चंद्रमा देवी नगर उदगीर, ता उदगीर जि. लातुर ३) बबीता सुरज उपाध्ये, चय ५७ वर्षे, रा.  उदगीर जि लातुर ४) पुजा धिरज कांबळे, वय ३५ वर्षे, रा. भदाडे चौक, गांधीनगर उदगीर, जि लातूर आणि ५) गणेश विलास जाधव, वय ३० वर्षे सध्या रा भुशन नगर २ ब झोपडपट्टी आण्णासाहेब पाटील शाळेजवळ सोलापुर.ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे ताब्यातुन सोन्याची २० मिनी गंठण/मंगळसुत्रे असे एकुण १९.४१,३१०/- रुपये किंमतीचे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.
तसेच पालखी सोहळा दरम्यान आरोपी नामे अरबाज नौशाद शेख  १९ वर्षे रा महाराजपुर,थाना जलझारी जि साहेबगंज झारखंड एका चिची संघर्शतः बालकारा बयः ॥७ वर्षे साना ताब्यात घेवुन त्यांचेकरी कौशल्यपुर्वक तपास करून त्याचे ताब्यातुन कि ४५०,०००/- रुपयाचे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे एकूण १४ मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करुन त्याचेकडुन १) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५९५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) २) हडपसर गुन्हा रजिस्टर नंबर ५९६/२०२५ भारतीय न्याय सहित। कलम ३०३ (२), ३) वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) असे एकुण ०३ गोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत. उर्वरीत मोबाईलचे मुळ मालकाचा व सोन्याचे दागिन्यांचे मुळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

अशाप्रकारे गुन्हे शाखेकडून सहा आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साडेबावीस तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गंठण व 14 मोबाईल हँडसेट असा एकूण 23 लाख 91 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 

  पालखी सोहळ्याच्या दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल हँडसेट किंवा ज्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांच्यासह युनिट पाच व युनिट सहा गुन्हे शाखेने व त्यांच्या टीमने पार पाडली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार
आधुनिक केसरी न्यूज  जगदीश राठोड जालना : मंठा तालुक्यातील मौजे अंभोडा कदम, ग्रामपंचायतीमध्ये विविध शासकीय योजना, वित्त आयोगाच्या निधी, तसेच...
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांवर डल्ला मारणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद.
साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्या मागे सदैव उभा राहीन ! इतर पक्षात जाण्याची वेळ आल्यास राजकारणाला राम राम ठोकेन !
भडगाव तालुक्यात मांडकी गावात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजाराची लाच ग्रामसेवक व रोजगार सेवकाला भोवली
संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 
जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके
शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी