साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्या मागे सदैव उभा राहीन ! इतर पक्षात जाण्याची वेळ आल्यास राजकारणाला राम राम ठोकेन !

प्रसार माध्यमात पक्ष बदलांच्या वावड्या उठवणाऱ्यांचा निषेध-गजानन पाटील मुंडे

साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्या मागे सदैव उभा राहीन ! इतर पक्षात जाण्याची वेळ आल्यास राजकारणाला राम राम ठोकेन !

आधुनिक केसरी न्यूज

लक्ष्मीकांत मुंडे 

किनवट- माजी आमदार, माझे नेते स्व.प्रदीप नाईक साहेबांच्या  नेतृत्वात घडलो आहे. राजकारण, समाजकारण करत असताना नाईक साहेबांचा आदर्श सदैव डोळ्यापुढे असतो. त्यामुळे नाईक साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्याच मागे सदैव उभा राहील इतर पक्षात जाण्याची पाळी आल्यास राजकारणाला कायम रामराम ठोकेन परंतु नाईक साहेबांशी गद्दारी करणार नाही.प्रसार माध्यम उगाचच वावड्या उठवत असून मी त्याचा जाहीर निषेध करतो. असे प्रतिपादन किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे यांनी साप्ताहिक वंजारी पुकारशी अनौपचारिक रित्या बोलताना केला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात हायट्रिक करणारे लोकप्रिय आमदार स्व.प्रदीप नाईक यांच्या निधनानंतर किनवट मध्ये राष्ट्रवादी  शरदचंद्र पवार पक्ष संपला असे काही ना वाटले होते. परंतु पक्षात  त्यांनी तयार केलेल्या निष्ठावंतांनी ना केवळ पक्ष उभा ठेवला तर वाढवला व मजबूतही केला. नाईक साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराची मानसिक स्थिती सावरायला वेळ लागल्याने वेगवेगळे तर्क वितर्क व चर्चांना उधान आले. अशात काही प्रसारमाध्यमांनी अनेक निष्ठावंत इतर पक्षाच्या मार्गावर असल्याच्या वावड्या उठवल्या आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणीला लागला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष नेतृत्वाच्या चाचणीला लागला आहे. त्यातच माजी आमदार आमचे नेते स्वर्गीय प्रदीप नाईक यांचा वारसा पुढे चालवण्याकरिता त्यांचे सुपुत्र, आमचे युवा नेते कपिल नाईक पुढे सरसावले आहेत. त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला असल्याने पक्षात नवसंजीवनी संचारली आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरणे निश्चित आहेच. त्यामुळे आता पक्ष फुटीच्या वावड्या उठवण्याचे राजकारण सुरू झाले आहे. त्यात आज दिनांक 24 जून रोजी पक्ष संघटनेची बैठक आहे. त्यामध्ये गैरसमज पसरवण्याकरिता काही प्रसार माध्यमांमध्ये पक्ष फुटी च्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या.ज्यामध्ये नाव न घेता काही सभापती व उमेदवार इतर पक्षाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या लागल्या आहेत. जे की धादांत खोटे असल्याचे सांगत गजानन मुंडे पाटील यांनी प्रदीप नाईक यांच्या वारसांच्या नेतृत्वावर निष्ठा असल्याचे सांगत, मी सदैव नाईक साहेबांच्या नेतृत्वातच काम करत राहणार असल्याची ग्वाही देत अफवा पसरवणाऱ्यांचा निषेध करत राष्ट्रवादी पक्ष आणि नाईक साहेबावर आपली निष्ठा व्यक्त केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका