तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड

रुग्णवाहिका नव्हती, ऑक्सिजन संपला! संतप्त गावकऱ्यांचा आरोप उपचाराअभावी दोन निष्पाप जीवांचा बळी?

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया :  गोंदिया जिल्ह्यातील सडक सडक अर्जुनी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होळी धुलीवंदनाच्या   दिवशीच दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन मंगळवार तीन मार्च रोजी सौंदड फूटाळा या गावात घडली. मृतकाचे नाव प्रणय गहाने 14 व सागर गहाने 17असे आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय सौंदड प्रशासनाचे पितळ उघड झाले आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे असे आहे की, जर वेळेवर दोघांनाही उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी या मागणीला घेऊन संतप्त गावकऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाचा घेराव करून प्रशासनाच्या विरोधात नाराजगी व्यक्त केली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाच मुले रंगपंचमीनंतर तलावात आंघोळीसाठी गेले होते.मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून सौन्दड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गावकरी, डॉक्टरांच्या मते दोघेही कोमामध्ये होते. पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले . आरोप आहे की ऑक्सिजन सिलेंडर रस्त्यातच संपल्याने ही दुर्दैवी घटना घडली. अशी माहिती समोर येत आहे.१२ ते १३ कोटी खर्चून उभारलेली इमारत; पण ना आयसीयू, ना जीवनरक्षक साधने, ना पोस्टमार्टम सुविधा! वेळेत उपचार मिळाले असते तर हे प्राण वाचविले जाऊ शकत होते.  असे म्हणणे ही गावकऱ्यांचे आहे. एकंदरीत या घटनेमुळे आरोग्य विभागाचे पितळ उघड झाले आहे. घटनेनंतर रुग्णालयासमोर नागरिकांनी घेराव घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी लागली.ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचा दावा करणाऱ्या शासनाचा हा दावा खोटा निघत आहे. दोन निष्पाप जीव गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? फुटाळा गाव आज शोकमग्न आहे; मात्र जबाबदारांवर कठोर कारवाई आणि तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार