दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार

दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार

आधुनिक केसरी न्यूज

 जगदीश राठोड

जालना : मंठा तालुक्यातील मौजे अंभोडा कदम, ग्रामपंचायतीमध्ये विविध शासकीय योजना, वित्त आयोगाच्या निधी, तसेच अनुसूचित जाती-जमाती, अपंग, महिला व इतर दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, बोगस कामे, अपारदर्शकता व लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामविकासाच्या नावाखाली निधीचा अपव्यवहार झाल्याचे अनेक पुरावे व तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त झाल्या आहेत.
      वित्त आयोग व विविध योजनांतील निधीचा अपव्यवहार पंधरावा वित्त आयोग, तांडा सुधार योजना, व दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत प्राप्त निधीचा विनियोग योग्य पद्धतीने न करता, न झालेल्या कामांचे खोटे बिल बनवून निधी उचलला गेला आहे. प्रत्यक्षात विकास कामे होत नसतानाही कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आलेली आहेत.पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचार या योजनेतील लाभार्थ्यांकडून ₹3,000/- रुपये प्रत्येक घरकुलासाठी वसूल करण्यात आले आहेत, जी मागणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. काही लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असूनही अडवून ठेवले आहे.अपंग व्यक्तींसाठीच्या योजनांकडे दुर्लक्ष अपंग अनुदानासाठी अर्ज केलेले लाभार्थी यांची दखलच घेतलेली नाही.
संबंधित निधी कुणाला दिला गेला याबाबत कोणतेही पारदर्शक दस्तऐवज ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाहीत.
   सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष महापुरुष जयंती व पुण्यतिथी शासकीय नियमानुसार साजऱ्या न करता औपचारिकता म्हणून टाळण्यात येतात. या दिवशी समाजप्रबोधन, स्वच्छता मोहीम, उपक्रम आयोजित करण्यास पूर्णतः टाळाटाळ केली जाते. ग्रामपंचायतच्या प्रशासनातील अकार्यक्षमता ग्रामपंचायत मासिक सभा नियमित घेतल्या जात नाहीत. ग्रामसभा मागील ५ वर्षात एकदाही घेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता निर्णय घेण्यात येतात.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार
आधुनिक केसरी न्यूज  जगदीश राठोड जालना : मंठा तालुक्यातील मौजे अंभोडा कदम, ग्रामपंचायतीमध्ये विविध शासकीय योजना, वित्त आयोगाच्या निधी, तसेच...
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांवर डल्ला मारणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद.
साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांच्या मागे सदैव उभा राहीन ! इतर पक्षात जाण्याची वेळ आल्यास राजकारणाला राम राम ठोकेन !
भडगाव तालुक्यात मांडकी गावात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजाराची लाच ग्रामसेवक व रोजगार सेवकाला भोवली
संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 
जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके
शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी