मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!

विस्तारअधिकाऱ्यांचा काढला नवा जॉब चार्ट चा शासन निर्णय, राज्यातून कौतुक

मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!

आधुनिक केसरी न्यूज

 सचिन सरतापे 

म्हसवड  सातारा : विस्तार अधिकारी वेळेवर कामावर येत नाहीत आणि ग्रामपंचायती तपासणी कडे दुर्लक्ष करीत असून चौकशी अहवाल व्यवस्थित सादर करीत नसल्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर  विश्वास मोहिते यांच्या या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार जयकुमार गोरे  यांनी विस्तार अधिकाऱ्यांच्या जॉब चार्ट चा नवा शासन निर्णय केलाआहे या निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासन गतिमान होणार असून  यां  विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याचे महाराष्ट्र राज्यातून कौतुक होत आहे.

 महाराष्ट्र राज्यातील काही ग्रामपंचायती विरोधात तक्रारी होऊनही विस्तार अधिकारी त्या तक्रारीच्या अनुषंगाने  चौकशी करण्यास टाळाटाळ करीत होते, त्याचबरोबर विस्तार अधिकारी वेळेवर कामावर न येणे मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणे, शासनाचे नियमाप्रमाणे ग्रामपंचायत निधीचे योग्य विल्हेवाट लावली किंवा नाही वेळेत खर्च केला किंवा नाही याबाबतच्या तक्रारी  वारंवार होत असताना विस्तार अधिकारी मात्र आमचा जॉब चार्ट तयार नसल्याच्या खुलासा वारंवार देत होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे किंबहुना त्या गावाचे त्याचबरोबर पर्याय शासनाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात त्याचा मोठा तोटा होत होता.
 विस्तार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत आणि सर्वसामान्य नागरिकाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पाडळी केसे तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  विश्वास बाबुराव मोहिते यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना भेटून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याचबरोबर त्या संदर्भात  पत्रव्यवहारही केलेला होता. या पत्र व्यवहाराची जखन मुख्यमंत्री मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाने घेतली असून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आणि सांख्यिकी विस्तार अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांनी पुढाकार घेऊन 30 जून 2025 रोजी  नव्याने शासन निर्णय पारित करून त्यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची कर्तव्य कार्य आणि संपूर्ण जॉब चार्ज  असल्याचा शासन निर्णय घोषित केला आहे.
 30 जून 2025 च्या शासन निर्णयाप्रमाणे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी यांची स्वतंत्र कार्यपद्धती त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत विस्ताराधिकाऱ्यांनी दरमहा किमान दहा ग्रामपंचायतीची तपासणी आणि कामकाजाची पाहणी करणे, त्याचा अहवाल त्या तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना सादर करणे, ग्रामपंचायत स्तरावरील जसे महिला बालकल्याण दिव्यांग 15 टक्के अनुदान अशा विविध खर्चाबाबत योग्य तो तपशील तपासणी करून त्यामध्ये सत्यता पडताळून योग्य तो आदेश देणे, महिन्यातून पंधरा दिवस दौरे करणे आणि त्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करणे आणि विशेष म्हणजे विस्तार अधिकाऱ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करणे असा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शक आणि गतिमान चालणार आहे. विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे विश्वास मोहिते यांचे तालुका सातारा जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.

*..आता मात्र विस्ताराधिकारी काय काम करणार...*
 ग्रामविकास  खात्याने विस्तार अधिकाऱ्यांच्या जॉब चार्ट चा नवा शासन निर्णय केल्यामुळे विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याला यश आले त्याबाबत विश्वास मोहितेची चर्चा केली असता, खरंतर हा माझा विजय नसून हा संविधानाचा विजय आहे. यापुढे मी असाच पाठपुरावा करत राहणार आहे. यापूर्वी विस्तार अधिकारी वेळ काढून पणा करायच्या उद्देशाने शासन निर्णयाप्रमाणे आमचा जॉब चार्ट च नाही अशी उत्तरे देत होते मात्र आता नवा शासन निर्णय झाल्यामुळे  मी प्रथमतः मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना धन्यवाद देत असून आता या निर्णयामुळे विस्तार अधिकाऱ्यांना कामच करावं लागणार आहे याचं समाधान मला वाटते.

 *गटविकास अधिकाऱ्यांनी ही सतर्क राहण्याची गरज*
 30 जून 2025 रोजी नव्याने ग्रामविकास खात्याने काढलेल्या शासन निर्णयामुळे विस्तार अधिकारी यांच्या कार्यपद्धतीत गतिमानता येणार असून विस्ताराधिकाऱ्यांनी गतिमान काम केल्यामुळे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांची ही वाढली असून यापुढे विस्तार अधिकाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी ही सतर्क राहण्याची गरज आहे.

 *...हा पाडळी( केसे) गावाचा नावलौकिक..*
 विश्वास मोहिते हा पाडळी केसे गावचा रहिवासी सुपुत्र असल्याने त्याच्या पाठपुराव्यामुळेच प्रशासन गतिमान आणि पारदर्शक सुरू आहे हा केवळ विश्वास मोहितेचा विजय किंवा सन्मान नसून हा आमच्या गावाचा सन्मान आहे.
*अनिल कदम, मा. सरपंच*

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यात तिसंगी, विसापूर, शिरढोण येथे आज चौथ्या दिवशी मोजणी रोखली..!
म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त
मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!
धक्कादायक दौंडच्या स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला निघालेल्या महिलांना लुटले अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून अत्याचार..!