म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त

म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त

आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे 

म्हसवड सातारा : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू, ताडी विक्रीला आळा घालण्यासाठी सपोनि अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज मोहीम राबवली असून अवघ्या एका दिवसात ३ ठिकाणी छापा टाकून तब्बल १८० लिटर ताडी तसेच देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई म्हसवड पोलिसांच्या क्शन मोडचे उत्तम उदाहरण ठरत आहे. अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला आहे. या मोहीमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे दादासो किसन खुपकर (रा. पळसावडे, ता. माण, जि. सातारा), अशोक गुलाब बनसोडे (रा. इंजबाव, ता. माण, जि. सातारा), आनंदराव बाळू बनसोडे (रा. रांजणी, ता. माण, जि. सातारा) या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदारांनी संयम आणि दक्षतेने कामगिरी बजावली. ही विशेष मोहीम पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सपोनि अक्षय सोनवणे, सुभाष भोसले, रूपाली फडतरे, मैना हांगे, नीता पळे, सुरेश हांगे, नवनाथ शिरकुळे, युवराज खाडे, हर्षदा गडदे यांनी सहभाग घेतला. येणाऱ्या काळातही अशीच ठोस व प्रभावी कारवाई सातत्याने राबवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यात तिसंगी, विसापूर, शिरढोण येथे आज चौथ्या दिवशी मोजणी रोखली..!
म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त
मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!
धक्कादायक दौंडच्या स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला निघालेल्या महिलांना लुटले अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून अत्याचार..!