सिम्बॉयसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज येथे अर्थशास्त्र व नीतिशास्त्र या विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : JSDIVSR व SCMS नागपूर यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत, भारतीय ज्ञान परंपरेचा आधुनिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन म्हणून अर्थशास्त्र व नीतिशास्त्र या विषयावर दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण संपन्न झाले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मार्गदर्शन JSDIVSR चे प्रमाणित IKS मास्टर ट्रेनर डॉ.भरत दाश यांनी केले अर्थशास्त्र व नितीशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथावरील सखोल मार्गदर्शन या सत्रात केले. प्रशिक्षणात शासन प्रणाली, नेतृत्व आणि नीतिमूल्य यावरील मूलभूत तत्वांचा अभ्यास याद्वारे करण्यात येऊ शकतो यावर त्यांचा अधिक भर होता.या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे चाणक्य यांचे सप्तांग सिद्धांत हे होते. ह्यात त्यांनी आधुनिक व्यवस्थापन व संघटनात्मक रचना या तत्त्वांचा प्रभावीपणे संदर्भ दिला.
कार्यक्रम यशस्वीतेकरता आचार्य श्रेयस कुऱ्हेकर ( JSDIVSR IKS सेंटरचे संचालक ) व श्री अनुराग देशपांडे ( JSDIVSR संचालक मंडळ सदस्य ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
SCMS नागपूरचे संचालक डॉ. समीर पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे अत्यंत नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. झेरिचो मारक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या एफ डी पी मध्ये संपूर्ण भारतातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या विविध परिसरातील प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List