गट विकास अधिकारी यांच्या अंगावर फेकल्या नोटा,कामात अडथळा निर्माण करणे आले ब्राम्हणवाडा सरपंचाच्या अंगलट..!
आधुनिक केसरी न्यूज
महादेव हरणे
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम ब्राम्हणवाडा चे सरपंच गोपीनाथ शिवाजी नागरे यांनी प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) अंतर्गत लाभार्थ्यांना हप्ते मिळत नसल्याचाआरोप करत मालेगाव पंचायत समिती कार्यालयात थेट गटविकास अधिकारी (BDO) व्ही. एस. खेडकर यांच्यावर नोटा फेकल्याची धक्कादायक घटना आज (१८ जून) दुपारी १२.२५ वाजता आरोग्य विभागाच्या एका बैठकीस जात असताना घडली.ब्राम्हणवाडा न. मा. चे सरपंच शिवाजी नागरे यांनी आरोप केला की, "गावातील अनेक लाभार्थ्यांचे घरकुल हप्ते रखडलेले आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांना बोलताना घरकुल संबंधित विषयावर समाधान न झाल्यामुळे
संतापलेल्या नागरे यांनी हे घ्या पैसे!” असे म्हणत थेट नोटा फेकल्या आणि मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी गटविकास अधिकारी खेडकर यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश कंकाळ, विस्तार अधिकारी दिलीप देवकते, प्रमोद लोखंडे, स्वप्निल खंडारे आणि शिपाई सलीम शाह खाकी शाह उपस्थित होते. घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित केली. दरम्यान, या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याची तक्रार सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश कंकाळ यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरपंच नागरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज पंचायत समिती मध्ये ब्राम्हणवाडा सरपंच यांनी नोटा फेकण्याचा जो प्रकार केला तो निश्चितच चांगला नव्हता.
सरपंच यांनी आणलेले घरकुल प्रस्ताव व दिलेल्या वेळे नुसार जिओ टॅगिंग साठी आमचे RHE हे गावामध्ये पाठविण्यात आले व घरकुलचे पैसे सुद्धा पंचायत समिती मधून सोडण्यात आले, कदाचित स्टेट लेवल वर पैसा उपलब्ध नसल्यामुळे पैसा जमा झाला नसावा.
विनोद खेडकर
गट विकास अधिकारी
पं. स.मालेगाव.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List