छावा तर्फे आमदार, खासदार, मंत्री यांच्या राज्यस्तरीय रमी पत्ते, व कुस्ती आखाडा स्पर्धा
आधुनिक केसरी न्यूज
अक्षय ताठे
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री व ऊपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त,राज्यस्तरीय स्पर्धा, आयोजन करण्यात आले.कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा,आमदारांनो, खासदारांनो, आणि मंत्र्यांनो, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विधानमंदिराचा गुंडगिरीचा आखाडा केलाय,प्रत्येक जण आपापल्या नेत्याला आपली फुशारकी दाखवण्यासाठी आपापले गुंडकार्यकर्ते आणून मारामारी करताय, काही वाचाळवीर आर्वाच्य शिव्या देताय. काही तर चक्क विधान मंदिरात "पत्ते रमी जुगार गेम खेळतात,शेतकरी कष्टकरी, कामगारांची खिल्ली ऊडवत, विकासाचं कोणि बोलत नाही, हाच का आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र,प्रत्येकजण ऐकमेकाची ऊणेदुणे वैयक्तिक आब्रची धिंडवडे काढतायेत.म्हणून रमी आणि कुस्तीची महास्पर्धा आयोजित करण्यात आली.
राज्यस्तरीय स्पर्धा कोण कोण कशे कशे दंड बैठका मारतोय ते आज बघायल मिळाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून, कोकाटे, जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकर, संजयगायकवाड, संजय शिरसाठ, बबनराव लोणीकर, दुबे, संजय राऊत यांना पाचारण करीत केले त्यावेळी शेतकरी आले होते.त्यांनी आसूड मारून आंदोलन करण्यात आले.ह्यावेळी चंद्रकात भराड , अशोक मोरे , नितीन कदम, राजीव थिटे, विजय काकडे, अरुण नवले, आत्माराम शिंदे, नानासाहेब पळसकर, कृष्णा गाडेकर, नामदेव पळसकर, मानसिंग पवार , रावसाहेब पळसकर , भगवान पळसकर,सुभाष लहाने यांनी आंदोलन केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List