उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मांजरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
आधुनिक केसरी न्यूज
रोहित दळवी
मांजरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना फळे व पौष्टिक खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण रणदिवे, उपविभाग अधिकारी राहुल खलसे, गणेश घुले, संतोष ढोरे, शाखाप्रमुख गणेश मरळ, महिला आघाडी विभाग संघटिका वर्षा खलसे, मधुकर सकट, कुंदन खलसे दर्शन शिंदे, कुणाल गुप्ता यांनी केले होते. याप्रसंगी विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे, सोमनाथ गायकवाड, मतिमंद मुलांच्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नारायण पवार, मानसशास्त्रज्ञ मेधा शिंदे, वसतिगृह अधीक्षक अर्जुन नांदे, विशेष शिक्षक प्रकाश नाटकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर वर्ग आदी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List