गोवा सरकारकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५२ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ
आधुनिक केसरी न्यूज
पणजी : २१ जुलै २०२५ : राज्यातील रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेत गोवा मंत्रिमंडळाने त्यांच्या मासिक वेतनात तब्बल ५२ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सुमारे ३,००० कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे.२०२५–२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘रोजंदारी कर्मचाऱ्यांना तात्पुरता दर्जा प्रदान करणे’ या योजनेच्या अंतर्गत, सात वर्षांहून अधिक काळ अखंड सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता तात्पुरता दर्जा दिला जाणार आहे. या निर्णयामुळे त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव वेतन, ईपीएफ योगदान, सशुल्क रजा यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
या योजनेअंतर्गत, अकुशल कामगार जसे की सफाई कर्मचारी, मदतनीस, सुरक्षा रक्षक, आणि मल्टी टास्किंग स्टाफ यांना आता प्रतिमहा रु. १२,८१८ ऐवजी थेट रु. २०,००० इतके वेतन मिळणार आहे. कुशल कामगार जसे की चालक, विजतंत्रज्ञ, नळसंधारणकार, गवंडी आणि लिपिकवर्ग यांचे वेतन रु. २५,००० करण्यात आले आहे. यासोबतच प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला दरवर्षी ३ टक्क्यांचा वार्षिक वाढीव भत्ता मिळणार असून हे फायदे १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होतील.राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे त्यांच्या मेहनतीला दिलेले योग्य मूल्य आहे. अनेक वर्षे शासकीय सेवेत सातत्याने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची ही अधिकृत पावती आहे.“शासकीय यंत्रणेत कठोर परिश्रम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करत आम्ही हा निर्णय घेतला आहे. गोवा सरकार त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे,” असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List