मोखाड्यात भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर
On
आधुनिक केसरी न्यूज
तेजस रोकडे
मोखाडा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोखाडा फाटा येथील साई कृपा हॉस्पिटल येथे भारतीय जनता पक्षाच्या मार्फत तसेच आयडीयल हॉस्पिटल पोशेरी तालुका वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात जवळपास ५० पिशव्यांचे रक्तसंचालन करण्यात आले आहे.
तालुक्यातील मोखाडा तसेच खोडाळा विभागातून उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिर पार पडले, या रक्तदान शिबिरास विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी भेट दिली व रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी भाजपाचे संतोष चोथे,जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील,तालुका अध्यक्ष मिलिंद झोले,दिलीप गाटे, नरेंद्र चौधरी,प्रतीक पाघारे,एकनाथ झुगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
23 Jul 2025 13:38:58
आधुनिक केसरी न्यूज देगलूर : पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत आणखी एक धाडसी कारवाई करत अवैध...
Comment List