दौंडच्या स्वामी चिंचोली प्रकरणात दाजी व मेहुण्याच्या जोडीला पाच दिवस पोलीस कोठडी,पठाणवर आतापर्यंत 17 गुन्हे
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
इंदापूर : चारचाकी वाहनातून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट करीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे आरोपी हे दाजी व मेहुण्याची जोडी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दाजी व मेव्हण्याच्या जोडीला जेरबंद केलं असून न्यायालयाने दोघांनाही पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली.30 जूनच्या पहाटे घडली होती भयानक घटना... पुणे सोलापूर महामार्गावर ३० जून रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या दाजी मेहुण्याच्या जोडीने देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटले होते. याचवेळी एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता. तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस या गुन्ह्यातील आरोपींच्या मागावर होते. अखेर या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेला अत्याचार व जबरी चोरी प्रकरणी अमिर सलीम पठाण वय २८ , रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर व विकास नामदेव सातपुते वय २६, रा. भिगवण, ता. इंदापूर या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.यातील संशयित आरोपी अमिर पठाण याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील एका हॉटेलमधून तर विकास सातपुते याला भिगवण येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
६ जून रोजी अत्याचार प्रकरणातील दोन संशयितांना बारामती येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संशयित अमिर सलीम पठाण याच्यावर यापूर्वी पुणे शहर व ठाणे येथे चोरी, घरफोडी व अन्य गुन्हे, असे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.आता त्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. तर अमिर पठाण याची बहिण ही विकास सातपुते याची पत्नी आहे. दोघांचेही हे दुसरे लग्न असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List