पावसामुळे मोहाडीत घराची भिंत कोसळली;  बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत पोहोचले मोहाडी गावात

पावसामुळे मोहाडीत घराची भिंत कोसळली;  बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत पोहोचले मोहाडी गावात

आधुनिक केसरी न्यूज

 गोंदिया भंडारा : सह पूर्व विदर्भात पाऊस संततधार कोसळत असून गेल्या दोन दिवसापासून गोंदियात पावसाचा जोर कायम आहे. या दरम्यान मुसळधार पावसाने अनेकांची घरे कोसळलेली आहेत .गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथेही घराचे नुकसान झाले .त्या घरांची पाहणी करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे व पदाधिकारी मोहाडी गावात दाखल होऊन पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असलेल्यामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मुंडीपार येथील मोहाडी गावालाही बसला आहे.या पावसामुळे श्रीमती सायन बाई सुरजलालजी बिसेन यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरातील वस्तूंचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे बिसेन कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.घटनेची माहिती मिळताच डॉ. लक्ष्मणजी भगत (अर्थ व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद गोंदिया), गावाचे सरपंच श्री नरेंद्रजी चौरगडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री लिखीराम बघेले  यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
डॉ. भगत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून, योग्य ती मदत लवकरात लवकर दिली जाईल, असे आश्वासन दिले. स्थानिक ग्रामस्थांनी देखील तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला असून प्रशासनाकडून लवकरात लवकर आवश्यक ती मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सततच्या पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद सततच्या पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद
आधुनिक केसरी न्यूज  वरोडा : 9/7/2025 वरोडा तालुक्यात सतत तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पातळीत वाढ...
नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
राज्यातील ८५ वीज कामगार,अभियंते,अधिकारी व कंत्राटी कामगारांचा सहभाग 
पावसामुळे मोहाडीत घराची भिंत कोसळली;  बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत पोहोचले मोहाडी गावात
त्या गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले 
दौंडच्या स्वामी चिंचोली प्रकरणात दाजी व मेहुण्याच्या जोडीला पाच दिवस पोलीस कोठडी,पठाणवर आतापर्यंत 17 गुन्हे
जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया