पारनेर तालुक्यातील निघोज मध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला ४,८६,१०६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत..!
आधुनिक केसरी न्यूज
श्रीनिवास शिंदे
पारनेर : पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने पारनेर तालुक्यातील निघोज येथे अवैध प्रकारची वाहतूक करताना छापा टाकून ४ लाख ८६ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात निघोज येथील अक्षय भास्कर लाळगे या आरोपीला अटक करण्यात आली आहे तर ईशान जाकीर शेख व आतीक शेख हे दोन आरोपी फरार आहेत. या आरोपी विरूद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना पारनेर तालुक्यातील निघोज येथे अवैध सुगंधी पानमसाला, गुटखा आणि तंबाखू यांची अवैध प्रकारची वाहतूक करताना छापा टाकून कारवाई केली आहे. अवैध प्रकारची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी सोमवार दि.७ रोजी निघोज येथे मयूर पान स्टॉल येथे छापा मारला असता ४ लाख ८६ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी अक्षय भास्कर लाळगे (वय २७)रा. निघोज ता. पारनेर यास अटक करण्यात आले असून आरोपी ईशान जाकीर शेख व आतीक शेख रा. भिंगार हे दोघेजण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह अहिल्यानगर एलसीबी आणि पारनेर पोलीस पथक यांची सदरची कारवाई संयुक्तपणे पार पाडली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List