अपहरण झालेली मुलगी सापडण्यात सुपा पोलीसांना यश सुपा विशाल फटांगडे
आधुनिक केसरी न्यूज
पारनेर : भान्यासं कलम-137 (2) मधील अपहरण झालेली मुलगी सापडण्यात सुपा पोलीसांना यश सुपा पोलीसांची कारवाई
दिनांक 29/05/2025 रोजी सायं 19/00 वा चे सुमारास पळवे बु ता. पारनेर फिर्यादी यांचे राहते घरापासुन कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावु पळवुन नेले होते म्हणुन अज्ञात इसमांवरविरूध्द कायदेशिर फिर्याद सुपा पोलीस स्टेशन ला फिर्यादी दीली होती.
दिनांक. 06/07/3025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे सो सुपा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कणगर ता. राहुरी जि. अहिल्यानगर बसस्टॅन्ड येथे एक मुलगी बसुन आहे. असे कळविलेने आम्ही पोलीस स्टॉफ यांना सरकारी गाडीसह शोध घेणे कामे रवाना केले सदर टीमने राहुरी हद्दीत कसोशीने व शिताफीने सदर मुलीचा शोध घेऊन मुलीस ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपुस केली असता सदर मुलीबाबत सुपा पोलीस स्टेशन गुरनं-211/2025 बीएनएसएस 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर अपहरण मुलगी हि रा. पळवे बु ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथील असुन तिचे अपहरण केले आहे असे समजले. तरी मुलगी हिस फिर्यादी अनिता अंकुश बडे रा. पळवे ता. पारनेर यांचे ताब्यात दिले
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सो.श्री. सोमनाथ घार्गे सो, अहिल्यानगर, मा.अपर पोलीस अधिक्षक सो.श्री. प्रशांत खैरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर श्री. अमोल भारती सो. सहा. पोलिस निरीक्षक श्री. सोमनाथ दिवटे सो. यांचे मार्गदर्शनाखाली, पोउपनिरी/नागरगोजे, ग्रेडपोसई/कुटे, पोहेकाँ/धामणे, पोहेकाँ/मरकड, पोकाँ/सातपुते, पोकाँ/ गायकवाड, पोकाँ / लांघे यांनी सदरची कारवाई केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List