मानवत मध्ये धारदार हत्याराने सपासप वार केलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू

मानवत मध्ये धारदार हत्याराने सपासप वार केलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज

विलास बारहाते

मानवत : शहरात २९ जून रोजी घडलेली घटना पत्त्याचे पैसे दे म्हणत एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले होते.उपचारादरम्यान या जखमी तरुणाचा ३ जुलैला रात्री मृत्यू झाला. यात आता खुनाचे कलम लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.२९ जूनला खय्युम अत्तार करीम अत्तार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले. घरासमोर मुलगा इराफन याला करण ऊर्फ पप्पू शिवाजी मोरे याने पत्त्याचे पैसे दे म्हणत तोंडावर, डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून मारू लागला पैसे दिले नाही तर तुला जिवे मारून टाकतो अशी धमकी दिली होती.

घटनेत गंभीर जखमी झालेल्या इरफान आत्तार याच्यावर पाच दिवसांपासून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तोंडावर, डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने जखमा झाल्याने सुरुवातीपासून इरफानची तब्येत खालावल्याचे दिसून आले होते. पाच दिवसांनंतर इरफानचा गुरुवारी मृत्यू झाला. या  घटनेप्रकरणी जखमी तरुणाचे वडील खय्युम अत्तार करीम अत्तार यांच्या तक्रारीवरून करण ऊर्फ पप्पू शिवाजी मोरे विरुद्ध तीक्ष्ण हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा झाला होता. या प्रकरणात आणखी दोन संशयित असल्याची माहिती मिळत असून खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मानवत मध्ये धारदार हत्याराने सपासप वार केलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू मानवत मध्ये धारदार हत्याराने सपासप वार केलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज विलास बारहाते मानवत : शहरात २९ जून रोजी घडलेली घटना पत्त्याचे पैसे दे म्हणत एका तरुणावर तीक्ष्ण...
पाचोरा बस स्थानकात गोळीबाराचा थरार एक ठार..!
चंद्रपूर आणि घुग्घूसमधील हजारो घरांचे मालकी हक्क रखडलेले, स्थायी पट्टे द्या : आ.किशोर जोरगेवार
श्रींची पालखी पंढरपुरात दाखल ! 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी पायी वारी..!
नमामि गोदावरी कृती आराखडा अंमलबजावणी; जिल्हाप्रशासनातर्फे गोदावरी स्वच्छतेसाठी सामंजस्य करार
तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे
शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक ; आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी