शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक ; आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक ; आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. विविध भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या  गरजेनुसार एजी पंप देण्याची मागणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ. श्री. मुनगंटीवार यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली.*

आ. श्री. मुनगंटीवार यांनी सीआरआय कंपनीच्या सोलर पंपांबाबत आलेल्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे व दुरुस्तीच्या विलंबाकडे विधानसभेत लक्ष वेधले. “सोलर पंप उपयुक्त आहेत, मात्र जेथे सोलर पंप काम करत नाहीत, तेथे एजी पंप द्यावेत,’ अशी मागणी त्यांनी रेटून धरली.

या चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी सोलर पंपांच्या सबसिडी व कार्यक्षमता बाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

*शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे*

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी त्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात आला होता. अलीकडेच २० हजार हेक्टर प्रमाणे प्रत्येकी दोन हेक्टर धानाच्या बोनससंदर्भातील त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ९३ कोटी रुपयांचा बोनस जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लढण्याची तयारी हेच त्यांच्या कार्यशैलीचे खरे वैशिष्ट्य आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि.12 जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती...
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई