पाचोरा बस स्थानकात गोळीबाराचा थरार एक ठार..!
आरोपीची जामनेर पोलीस स्टेशनला शरणागती आरोपी पाचोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात
आधुनिक केसरी न्यूज
पाचोरा : शहरात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात आकाश मोरे (वय अंदाजे २५) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरुवातीच्या माहितीनुसार, आकाश मोरे याच्यावर अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, तो घटनास्थळीच कोसळून मरण पावला. (किती ग्राउंड फायर झाले किती गोळ्या लागल्या हे पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिक अधिकृत माहिती प्राप्त नाही ) गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली असून, काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.सध्या पोलिसांनी परिसर सील केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपास सुरू असून, आकाश मोरे याचा पूर्वीचा कुठला वाद होता का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी शांतता राखावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तपास जलदगतीने सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List