घरात ननंदेचा त्रास असह्य; लिपस्टिकने चिठ्ठी लिहून विवाहितेने चिमुरड्यासह टाकलं टोकाचं पाऊल

घरात ननंदेचा त्रास असह्य; लिपस्टिकने चिठ्ठी लिहून विवाहितेने चिमुरड्यासह टाकलं टोकाचं पाऊल

आधुनिक केसरी न्यूज

रोहित दळवी

पुणे : आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ननंदेच्या मानसिक छळाला कंटाळून एका ३१ वर्षीय विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मृत महिला मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) आणि तिचा मुलगा विष्णु शशिकांत देशमुख (वय ६) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरीने आत्महत्येपूर्वी लिपस्टिकने लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली. या चिठ्ठीत तिने आपल्या ननंदेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी मयुरीच्या पतीसह सासू आणि ननंद विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरात ननंदेचा त्रास असह्य; लिपस्टिकने चिठ्ठी लिहून विवाहितेने चिमुरड्यासह टाकलं टोकाचं पाऊल घरात ननंदेचा त्रास असह्य; लिपस्टिकने चिठ्ठी लिहून विवाहितेने चिमुरड्यासह टाकलं टोकाचं पाऊल
आधुनिक केसरी न्यूज रोहित दळवी पुणे : आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ननंदेच्या मानसिक...
चोर घेऊन आलेल्या गाडीमुळेच फसले; पोलिसांची सिनेमा स्टाईल कारवाई, मोठी चोरी टळली
दोन हजार लाच घेतांना शिंदखेडा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!
साक्री शहर भाजपात फुट,शिंदे सेना आणि काँग्रेसची साथ घेत आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षा सौ.जयश्री पवारांविरुध्द 'अविश्वास'
ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे दुःखद निधन..!
सिम्बॉयसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज येथे अर्थशास्त्र व नीतिशास्त्र या विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न