मजूरीचे पैसे वाटप करण्यावरून सख्या भावाने  केला भावाचा खून

मजूरीचे पैसे वाटप करण्यावरून सख्या भावाने  केला भावाचा खून

आधुनिक केसरी न्यूज

पिशोर : कन्नड तालूक्यातील दिगाव येथे मजूरीचे पैसे वाटप करण्यावरून सख्या भावाने सख्या भावाचा चाकूचे सपासप वार करून खून केल्याची घटना दि.१० सकाळी ०९:३० वाजेच्या दरम्यान घडली सुनिल भिमराव अव्हाड ( ३६)  रा. दिगांव ता.कन्नड असे मयताचे नांव आहे . या बाबत आधिक माहिती अशी कि आरोपी विनोद भिमराव अव्हाड (४२) , फिर्यादी प्रकाश भिमराव अव्हाड ( ४४) व मयत सुनिल भीमराव अव्हाड ( ३६) हे तिघे सख्ये भाऊ एकाच घरात राहतात. त्यांना तिघांना मिळून एका बांधकाम मजूरी चे एकत्र एक हजार रुपये आलेले होते हे पैसे आम्हाला आत्ताच वाटून  पाहिजे असे म्हणून  त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले यात आरोपीने रागाच्या भरात  शेजारीच पडलेला चाकू उचलून  मयताच्या गळ्यावर व पाठीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याच्या आशयाची तक्रार प्रकाश अव्हाड याच्यां फिर्यादी वरून पिशोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे . दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी  विनय कुमार ठाकुरवाड , सपोनि शिवाजी नागवे व रायटर विलास सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपी यास अटक केली असून  पूढील तपास पिशोर पोलीस करीत आहे ..

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१३ जून माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकलने परत...
अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटने मुळे राळेगण सिद्धीचे सर्व क्रार्यक्रम केले रद्द
चक्रीवादळामुळे चाळीसगाव तालुक्यात केळींच्या बागांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी हवालदिल 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केली रविकांत तुपकर समर्थक अक्षय पाटील व वैभव जाणे यांना अटक..!
मजूरीचे पैसे वाटप करण्यावरून सख्या भावाने  केला भावाचा खून
माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!
अहो आश्चर्यम पहिल्या पिकात निघाला गणेशमुर्ती असलेला मोती..!