वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर आग्या मोहोळ मधमाशांचा हल्ला

विषारी डंखाने दोघे गंभीर,तर अनेक महिला व पुरुष जखमी

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर आग्या मोहोळ मधमाशांचा हल्ला

आधुनिक केसरी न्यूज

बजरंगसिंह हजारी

माहूर : दि. १० जून : दरवर्षी हिंदू धर्मातील महिलांकडून वटसावित्री पौर्णिमेनिमित्त उपवासाचे व्रत ठेवून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालण्याची जूनी धार्मिक परंपरा असल्याने,आज मंगळवारी १० रोजी माहूर शहरातील अनेक व्रतस्त महिला वार्ड क्रमांक ०५ मधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळे जवळील हनुमान मंदिर लगतच्या वटवृक्षाजवळ दुपारी तीनच्या सुमारास मनोभावे पूजा व प्रदक्षिणा घालत असताना सदरील शेकडो वर्षे जुन्या वटवृक्षावर बसलेल्या आग्या मोहळाच्या मधमाशांच्या पऊळातील असंख्य  मधमाशांनी अचानकपणे आक्राळविक्राळ रुप धारण करून  व्रतस्त प्रदक्षिणा घालणाऱ्या महिलांवर आणि रस्त्यावरून  जाणाऱ्या पुरुषांवर जबरदस्त हल्ला केल्याने यात एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले तर अनेक गंभीर जखमी महिलांनी त्याच अवस्थेत धावतपळत आपले घर गाठले.तरीही मधमाशांनी या महिलांचा पाठलाग दुरवर त्यांच्या घरापर्यंत केल्याने या परिसरातील वातावरण प्रचंड अफरातफरीचे झाले होते.

परंपरेप्रमाणे दरवर्षी वार्ड क्रमांक पाच मधील  हनुमान मंदिरा वरील वट्यावर हजारो महिला दिवसभरात येऊन वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असतात सकाळी 11:25 मिनिटांनी मुहूर्त असल्याने महिलांनी तोबा गर्दी केली होती तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती धुप लावून नारळ अर्पण करत वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा अर्ज सुरू केली होती 

दुपारी तीन वाजता अगरबत्ती धूप चा दुप्पट जास्त झाल्याने शेजारीच  झाडावर असलेल्या माऊळातील  मधमाशांनी अचानकपणे येथे आलेल्या महिलावर हल्ला चढवला यामध्ये सौ चंदा दिलीप पांडे वय 65 राहणार ब्राह्मण गल्ली माहूर आणि रस्त्यावरून चाललेले विलास मोतीराम पवार 45 वर्षे राहणार बंजारा तांडा माहूर यांच्यावर शेकडो मधमाशांनी हल्ला करत कडाडून चावे घेतले त्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले तर अनेक महिलांना मधमाशांनी चावा घेतल्याने महिलांनी तेथून पळ काढला घटना पाहून अनेकांनी आपल्या वाहनाद्वारे दोघांना ग्रामीण रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मागेही मधमाशा लागल्याने त्यांनी कसेबसे ग्रामीण रुग्णालय गाठले येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण वाघमारे यांनी जखमीवर उपचार केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..! माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!
आधुनिक केसरी न्यूज  प्रणव वराडे  लोणार : तालुक्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका माजी सरपंचाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत...
अहो आश्चर्यम पहिल्या पिकात निघाला गणेशमुर्ती असलेला मोती..!
टायगर सफारीला मिळणार वेग : आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर  वनमंत्री  यांची मंत्रालयात बैठक
अखेर 'गोरेश्वर'वर बाजीरावांनीच मारली "बाजी"
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर आग्या मोहोळ मधमाशांचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांत गाई-म्हशीचे वासरु व रेडा ठार पशुपालक शेतकरी प्रचंड दहशतीखाली
बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काॅग्रेसचा जन आक्रोश मोर्चा विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन