बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांत गाई-म्हशीचे वासरु व रेडा ठार पशुपालक शेतकरी प्रचंड दहशतीखाली

नुकसानभरपाई देऊन वनविभागाने तत्परतेने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांत गाई-म्हशीचे वासरु व रेडा ठार पशुपालक शेतकरी प्रचंड दहशतीखाली

आधुनिक केसरी न्यूज

बजरंगसिंह हजारी

माहूर : दि. १० जून  तालुक्यातील गुंडवळ येथील अल्पभूधारक महिला शेतकरी रमाबाई वसंता कांबळे यांनी माहूर शहरालगतच्या जमदग्नी ॠषि खोरीजवळील आपल्या शेतातील गोठ्यात दि.०६ जूनच्या रात्री बांधून ठेवलेल्या गाईच्या वासरावर बिबट्या ने हल्ला चढवून ठार केल्याची घटना ताजी असतानाच तीसऱ्याच दिवशी लिंबायत येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल गोपालसिंह चुंगडे यांच्या चक्क गावातील घराशेजारील  गोठ्यात बांधून असलेल्या दुभत्या म्हशीच्या रेड्यास (नर पिल्लू) बिबट्याने हल्ला करून बाजूच्या उसाच्या फडात उचलून फरफटत नेत  फस्त करुन ठार केल्याची आणखी एक सणसणीखेज घटना दि.०९ जूनच्या रात्री घडल्याने पशुपालक शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भौगोलिकदृष्ट्या उंच पहाडी,दुर्गम डोंगराळ माहूर तालुक्यात जसजसा उन्हाळा अंतिम टप्प्यात येतोय अन् पावसाळ्याची चाहूल लागतेय नैसर्गिक पानझडी मुळे जंगल ओसाड पडतायेत, परिणामी आपले भक्ष शोधन्यासाठी हिंस्त्र वन्यप्राणी देखील शेत-शिवारातील गोठ्यासह गावाकडे देखील आपला मोर्चा वळवत असल्याचे दि. ९ रोजी लिंबायत (जूने) येथील अनिल चुंगडे यांनी आपल्या  गावातील घराशेजारील गोठ्यात रात्री नेहमीप्रमाणे बांधून ठेवलेल्या दुभत्या जनावरांपैकी म्हशीच्या एका नर पिल्यावर (रेडा) हल्ला करून ठार केल्याच्या खळबळजनक घटनेवरून उघड झाले आहे. विशेष म्हणजे बाजूलाच बांधून असलेल्या तीन म्हशी व त्यांचे दोन रेडकूंवर बिबट्याने हल्ला केला नसल्याने त्यांचा जीव वाचला तर पशुपालकाचे आणखी मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचले.

  लिंबायत (जूने) येथील अनिल चुंगडे हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या चार एकर शेतजमीनीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शेतीसह जोडधंदा म्हणून ते दुभत्या म्हशी व बकऱ्यांचे पशुपालन देखील करतात. दि. ०९ जून रोजी रात्री त्यांनी गोठ्यात आपल्या तीन दुभत्या म्हशी व त्यांचे तीन रेडकू बांधून ठेवले होते.
सकाळी दुभत्या साठी गेले असता तीनपैकी एक रेड गोठ्यात दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध केली असता, बाजूच्या उसाच्या शेतात सदरील तीन ते चार महिन्याचा रेडा अर्धवट खाल्लेल्या मृतावस्थेत पडून असल्याचे त्यांना दिसून आले.
बिबट्याने सदरील रेडा ठार केल्याने चुंगडे यांच्या म्हशीने दुभते थांबवले असल्याने पशुपालक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून, वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव प्राण्याची नुकसानभरपाईची मागणी आपत्तीग्रस्त पशुपालक शेतकरी अनिल चुंगडेसह उपसरपंच सुनील चुंगडे यांनी वनविभागाकडे ऑनलाईन व ऑफलाइन अर्जाद्वारे केली असून, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी तीन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बहुमूल्य पशुधनावर हल्ला करून ठार मारणारा बिबट्या एकच कि, अनेक याचा तातडीने शोध घेऊन सदरील पाळीवप्राणीखोर बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रचंड दहशतीखाली वावरत असलेल्या  पशुपालक शेतकऱ्यांमधून होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..! माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!
आधुनिक केसरी न्यूज  प्रणव वराडे  लोणार : तालुक्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका माजी सरपंचाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत...
अहो आश्चर्यम पहिल्या पिकात निघाला गणेशमुर्ती असलेला मोती..!
टायगर सफारीला मिळणार वेग : आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर  वनमंत्री  यांची मंत्रालयात बैठक
अखेर 'गोरेश्वर'वर बाजीरावांनीच मारली "बाजी"
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर आग्या मोहोळ मधमाशांचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांत गाई-म्हशीचे वासरु व रेडा ठार पशुपालक शेतकरी प्रचंड दहशतीखाली
बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काॅग्रेसचा जन आक्रोश मोर्चा विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन