पिशोर पोलिसांची धडक कारवाई.१२,७०,००० रुपये किमतीच्या चोरी गेलेल्या १४ मोटरसायकल केल्या जप्त. दोन आरोपी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज
पिशोर : पिशोर पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत १२,७०,००० रुपये किमतीच्या चोरी गेलेल्या १४ दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. नाविदोद्दीन नजीरोद्दीन शेख (वय वर्ष २४ रा.नागापूर) व शेख मुजाहिद शेख युनूस उर्फ मुज्जू डॉन (रा. करीमनगर, कन्नड) असे जेरबंद केलेल्या आरोपींचे नाव आहे.
फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव येथील सकाहरी जंगले यांनी दिनांक २८ मे बुधवार रोजी स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम एच २० जी पी २२९४ चोरी गेल्याची पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सपोनी शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलिसांनी तपास सुरू केला. नागापूर येथील नाविदोद्दीन नजीरोद्दीन शेख याच्याकडे चोरी गेलेली स्प्लेंडर गाडी आल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. आरोपीस ताब्यात घेत पिशोर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरल्याचा गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यात शेख मुजाईद शेख युनूस उर्फ मुज्जू डॉन (राहणार करीमनगर कन्नड) याने मदत केल्याची व इतरही अनेक मोटरसायकल चोरल्याचे चौकशी दरम्यान कबूल केले. मिळालेल्या माहितीनुसार पिशोर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत सिल्लोड शहर, कन्नड ग्रामीण, एमआयडीसी सिडको, अजिंठा फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीतील जवळपास १४ मोटरसायकली जप्त करून २ आरोपींना अटक केली. या दोघांना कन्नड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. विजयकुमार राठोड छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक सतीश वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरताडे पोलीस हवालदार विलास सोनवणे, लालचंद नागलोत, दत्तू लोखंडे, परमेश्वर दराडे, गणेश कवाल, पवन खंबाट, साई घुगे, भौतिक सपकाळ, करण मस्के, कल्याण बहुरे, आदींनी केली..
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List