पाऊले चालती पंढरीची वाट ; श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान..!

पाऊले चालती पंढरीची वाट ; श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान..!

आधुनिक केसरी न्यूज

शेगांव : दि.२  होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
 काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥ या अमृतमय अभंगवाणी प्रमाणे वारकरी व्हा वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा.बाकीचे साधने काय करायची आहे? सर्व काही फळ यानेच मिळते.असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्येय येतो आज सोमवार दि.२ जुन रोजी सकाळी ७ वा. श्रीचे सेवाधारी विश्वासत यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पूजन, करुन दर्शन घेतले.शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे.

संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोष संत नगरी दुमदुमली आहे. श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवसा पायीवारी करीत एकूण ७५० किलोमिटर प्रवास करती  दि.४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल. ५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दि.१० जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दि ३१ जुलै २०२५ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.

पाऊले चालती पंढरीची वाट

१) पायदळ वारीचे ५६ वे वर्ष 
श्रींच्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा ५६ वे वर्ष आहे. श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीचीपरंपरा कायम ठेवली आहे. या पालखी सोबत शेकडो वारकरी भाविक पंढरपूरची वारी करत असतात. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सवीतोपरी व्यवस्था श्री संस्थान कडून करण्यात येते.
२) शहरातील या मार्गावरुन  श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी करीता सोमवार दि.२ जुन २०२५ रोजी सकाळी ७.०० वा. श्री मंदिरातून प्रस्थान झाले. श्रींची पालखीचे उत्तर द्वारातून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर, तिन पुतळे परिसर भिम नगर, श्री क्षेत्र नागझरी रोडने श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी मार्गस्थ झाली आहे. 
३) वारी... संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारकयाची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात . . . . शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्य!
४) चौख पोलीस बंदोबस्त...
 जिल्हा पोलिस प्रशासनाने पालखी मार्गावर चौख
पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेआहे.
५) रांगोळी... 
श्रींच्या पालखीचे प्रस्थानवेळी पालखी मार्गावर विविध रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढले होते. तर भाविकभक्तांच्या दर्शनसाठी गर्दी केली होती तर या सोहळ्याला विदर्भ, मराठवाडा,खानदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.
६) वारी पेहराव.. 
वारी सोहळ्यामधील धवलवस्त्राधरी वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतिक आहेत. पांढरा सदरा, धोतर,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा वारकर्यांचा पेहराव आहे.
७) श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.
८) श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करते.
९) श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह ३ अश्व व ९ वाहने आहेत.
१०) वारकऱ्यांकरीता अॅम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यासह आहे. याव्दारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.
११) वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे. 
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. ४/०७/२०२५ ला पोहचेल.दि.५ जुलै ते ९ जुलै पर्यंत मुक्काम राहील व दि १० जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथुन परत शेगांव कडे परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन दि.३१ जुलै रोजी श्रींची पालखी शेगांव येथे दाखल होणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग