तुकूम येथे भीषण अपघात,आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी ; जखमींची रुग्णालयात जाऊन भेट

तुकूम येथे भीषण अपघात,आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी ; जखमींची रुग्णालयात जाऊन भेट

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : हायवा चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांना चिरडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. सानिका कुमरे (वय २२ वर्षे, रा. लक्कडकोट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना तुकूम येथे घडली असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काजल आश्राम हिची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हायवा चालक तुकूम परिसरातून जात असताना, चालकाला फिटचा झटका आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना आणि ऑटोला चिरडले. या घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर नागरिक जखमी झाले आहेत. यात नंदा उंबरकर (वय ५५, रा. मेजर गेट,) या किरकोड जखमी झाल्या आहेत. तसेच काजल आश्राम (रा. उपरवाही, ता. राजुरा) हिला जास्त इजा झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल मेश्राम हिची भेट घेतली आणि सुरु असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत हांत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना सदर घटना घडली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

१६ हजारांची लाच घेताना ए.सी.बी च्या जाळ्यात अडकल्या दोन महिला तलाठी १६ हजारांची लाच घेताना ए.सी.बी च्या जाळ्यात अडकल्या दोन महिला तलाठी
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे  किनवट - आपल्या पत्नीच्या नावाने शेतीच्या ७/१२ चे हस्तांतरण करण्यासाठी १६ हजार हजार रुपये लाच...
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार
तुकूम येथे भीषण अपघात,आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी ; जखमींची रुग्णालयात जाऊन भेट
पाऊले चालती पंढरीची वाट ; श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान..!
धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं केलं जप्त; जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त
जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
ओडिशा राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची चंद्रपूर वन अकादमीला भेट