मान्सुनपुर्व पावसाने पैठण न.प.चे पितळ उघडे; नालेसफाई झाली नसल्याने शहरात रोगराई पसरली
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठणः नुकत्याच झालेल्या आवकाळी पावसाने पैठण न.प.चे पितळ उघडे झाले असुन मान्सूनपुर्व नाले सफाई झाली नसल्याने गटार तुबंले असुन काही व्यापार्यांच्या दुकानात गटारचीचे पाणी घुसल्याने शहरात सांडपाणी व्यवस्था तसेच स्वच्छता नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.गेल्याच वर्षी कन्याशाळा रोड वरील गटार पाईप टाकुन बुजवून पाणी काढले परंतु नालेसफाई नसल्याने गटार पुन्हा रस्त्यावर आली. नव्याने रुजु झालेल्या मुख्याधिकारी कधीतरी येतात,सोमवारी मुख्यालयात हजर असावे लागते परंतु मुख्याधिकारी त्यांच्या वेळात कार्यालयात ऐवुन जातात त्यामुळे शहरातील विविध समस्या आहे विदारक होत चालली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून पैठणला स्वच्छतेच्या प्रश्नी ग्रासले असतांना आता त्यात पावसाची भर पडल्याने शहरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी नाले सफाई नसल्याने घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर जमा झाले आहे तर काही ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List