रामबाग मैदान वाचवले नागरिकांच्या आवाजाला मिळाले यश :आ.किशोरभाऊ जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : चंद्रपूरच्या रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्याचा घाट घालण्यात आला होता. याला चंद्रपुरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला. रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सुद्धा या मैदानाला वाचविण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली होती. दैनिक आधुनिक केसरीने सुद्धा याची दखल घेत नागरिकांची बाजू उचलून धरत कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती. या पार्श्वभूमीवर आज आमदार किशोर जोरदार यांनी चंद्रपूर आतील अनेक नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत रामबाग मैदानाला धक्का लावू नका अशी आक्रमक भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडली. विकासकामांना आमचा कधीच विरोध नाही, मात्र लोकशाहीत जनभावनेचा आदर झाला पाहिजे. रामबाग मैदान हे केवळ एक मोकळं जागा नसून, नागरिकांच्या सकाळ-संध्याकाळच्या फेरफटका मारण्याचे, खेळाडूंनी सराव करण्याचे आणि मुलांनी खेळण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. हा विरोध आमदार जोरगेवार यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पष्ट शब्दांत मांडला आणि नागरिकांच्या भावनांशी एकरूप होत जिल्हा परिषदेची इमारत दुसऱ्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा जागरुक नागरिकांचा विजय आहे. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे तो ऐकला गेला याचं समाधान आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List