आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सौ. कमलताई किसन कथोरे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शासकीय दाखले वाटप

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सौ. कमलताई किसन कथोरे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शासकीय दाखले वाटप

आधुनिक केसरी न्यूज

शंकर करडे

मुरबाड : दहावी बारावीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला ओढ असते ती आपल्या   पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घेण्यासाठी सर्व कागदपत्रे मिळली पाहिजे ही सर्व विद्यार्थ्यांची धावपळ असते हे सर्व पाहून  म्हसा परिसरातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक दाखले  एकाच छताखाली मिळाले पाहिजेत असे परिसरातील समाजसेवक बाळा शेठ घरत व कन्होल गावच्या सरपंच  रेश्मा ताई घरत   यांनी पुढाकार घेऊन शासकीय दाखल्यांचे वितरणाचे आयोजन केले होते. यासाठी सौ कमलताई किसन कथोरे महाविद्यालय, म्हसा व मुरबाड तहसीलदार कार्यालय यांच्या सयुक्त विध्यमाने दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 550 विध्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दाखले काढुण घेण्यात आले. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले.

महाविद्यालयामध्ये शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एका छताखाली शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक सर्व दाखले उपलब्ध झाले. शासकीय दाखले वाटप शिबिराचे उद्घाटन मुरबाड तालुक्याचे तहसीलदार  अभिजित देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच नायब तहसिलदार  शिंदे व इतर सर्व शासकीय अधिकारी वर्ग महाविद्यालयात शिबिरासाठी उपस्थित होते. परिसरातील सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून एकूण ५१३ दाखले शिबिरात वाटप करण्यात आले. त्यावेळी टीडीसी बँकेचे संचालक राजेश  पाटील व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

No comments yet.

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली/नागपूर : १५ जून गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक...
पतंजली योग जिल्हा सहप्रभारी पदी अविनाश गायकवाड यांची निवड..!
"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
ब्रेकिंग... नागभीड ब्रम्हपुरी मार्गावर उद्या मेगा 15 जून ब्लॉक
बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले
अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटने मुळे राळेगण सिद्धीचे सर्व क्रार्यक्रम केले रद्द