बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले

दोघांचेही पाय चेंदामेंदा ; आसोली फाट्यानजीकची घटना

बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले

आधुनिक केसरी न्यूज

बजरंगसिंह हजारी

माहूर : दि.१३ जून माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकलने परत जात असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची अपघाताची घटना आज दि. १३ रोजी सकाळी ७वाजता घडली असून, धडक इतकी जबरदस्त होती कि, दोन्ही दुचाकीस्वरांचे पाय अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने ते  कापून काढण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  माहूर तालुक्यातील कसारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे वय २८ व संजय तुकाराम येरमे वय २३ वर्षे हे दोघे युवक आज सकाळी त्याची एम.एच. २६ बी.आर. ६३०९ या क्रमांकाच्या दुचाकीने  माहूर येथे काही कामानिमित्त आले होते. येथून परत जात असताना सकाळी ७ वा. च्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यानजीक वाई बाजार कडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिक-या उडाल्या तर एकाच उजवा हात आणि उजव्या पायाची बोटे मोडली आहेत.

अपघाताची माहिती वाई बाजारच्या रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन बाभळे यांच्यासह त्याच्या सहका-यांनी रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने एकावर रुग्णवाहिके तर दुसऱ्या जखमीवर दवाखान्याच्या बाहेरच प्रथमोपचार करून समयसूचकता व कार्यतत्परता दाखवत दोघांही गंभीर जखमींना विनाविलंब यवतमाळला हलविले.माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची 108 ॲम्बुलन्स अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठवण्यास अडचण निर्माण होत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन 108 ॲम्बुलन्स द्यावे,अशी मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
आधुनिक केसरी न्यूज तेजस रोकडे  मोखाडा : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळताना चा...
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मांजरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा 
उत्सवांच्या काळामध्ये डीजे चा दणदणाट सहन केला जाणार नाही; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंची मंडळांना तंबी
रेल्वे च्या अपुऱ्या कामाबाबत 'जनसुराज्य' चे समित कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट दिले निवेदन
कीर्तन महोत्सव समितीतर्फे जेष्ठ नागरिक विजयकुमार गोखले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक