अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटने मुळे राळेगण सिद्धीचे सर्व क्रार्यक्रम केले रद्द

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रसिधी पत्रकाव्दारे माहिती

अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटने मुळे राळेगण सिद्धीचे सर्व क्रार्यक्रम केले रद्द

आधुनिक केसरी न्यूज

 विशाल फटांगडे 

पारनेर : १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेमध्ये २६० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो.काही वर्षांपूर्वी गुजरात मध्ये भूकंप झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने गुजरात राज्यामध्ये नियोजन आयोगावर काम करण्याची संधी मिळाली असताना अहमदाबाद या ठिकाणी जवळपास ६ महिने राहिलो होतो आणि संपूर्ण गुजरात मध्ये फिरलो होतो. अशा प्रकारे ज्या शहराशी संबंध आलेला असताना त्या शहरात अशी मोठी दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर मी माझा १५ जून रोजी होणारा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन याद्वारे करतो. तसेच या निमित्ताने १६ जून रोजी सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे अशा कार्यकर्त्यांना देण्यात येणारा सामाजिक सेवा पुरस्कार हा कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात येत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री. विजय रुपानी यांचे देखील या अपघातात निधन झाले आहे. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होत असेलेले इतर कार्यक्रम साजरे करणे संयुक्तिक होणार नाही आणि म्हणून हे कार्यक्रम देखील काही काळासाठी स्थगित करत आहोत. या कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल.

पुन्हा एकदा अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतोअसे  या पत्रात म्हटले आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!