भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजेच्या जनरेटरची मोटरसायकलला जोराची धडक मोटरसायकल स्वाराचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
किनवट - लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : जनरेटर सह भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजेच्या वाहनाची दोरी तुटल्याने जनरेटर व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याने या भिषण अपघातात मोटर सायकल चालकाचा मृत्यू झाला आहे, ही घटना ईस्लापुर ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी तांडा येथे दिनांक 23 मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या घटनेत मृत पावलेल्या तरूणांचे नाव योगेश काशीराम राठोड वय 35 वर्ष राहणार गोधन तांडा तालुका हिमायतनगर येथील रहिवासी आहे तर याच घटनेत दुसरा तरूण जखमी झालेल्या चे नाव गोरु अनिल राठोड वय 18 वर्षे राहणार बुरकुलवाडी तालुका किनवट येथील रहिवाशी आहे.
योगेश राठोड व गोरु राठोड हे दोघेही तरुण मोटरसायकल क्रमांक एम एच २६ झेड 9895 या मोटरसायकलने इस्लापूर कडे येत होते तर भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या डीजेच्या वाहनाला दोरीच्या साह्याने बांधून असलेले जनरेटर ची दोरी तुटल्याने हे जनरेटर मोटर सायकलला धडकल्याने मोटर सायकलचा अक्षरशा चुराडा झाला तर मोटरसायकलस्वार रोडच्या कडेला पाच फूट खाली जाऊन कोसळला. पांगरी तांडा येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या योगेश राठोड ला अति जलद सेवा देणाऱ्या 108 अंबुलन्स द्वारे या तरुणाला प्रथम उपचारासाठी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्या तरुणास मृत घोषित केले. डीजे चालक आपले वाहन घेऊन त्या घटनेपासून पसार झाला... या घटनेची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले असता घटनेचा आढावा घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी डीजे चालकाला पकडण्यासाठी डीजे चालकाच्या घरी पोहोचले मात्र तो चालक तेथून ही पसार झाला.या अपघातातील मोटर सायकल व जनरेटर इस्लापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोन्ही वाहन इस्लापूर पोलीस स्टेशनला दुसऱ्या वाहनाच्या साह्याने आणले आहे. अपघात स्थळावरून डीजेसह डीजे चालक पसार झाल्याने त्या डीजे चालकास पकडण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले व पोलीस कर्मचारी शर्यतीचा प्रयत्न करत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List