नवापूर तालुक्यात विसरवाडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू; वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता..!

नवापूर तालुक्यात विसरवाडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू; वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता..!

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रशेखर अहिरराव 

धुळे- सुरत : राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल राहुल समोर एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार (ता. २१ मे) रात्री उशिरा घडली. बिबट्याचा मृतदेह महामार्गाच्या कडेला आढळून आला असून, ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत बिबट्या अंदाजे १ ते  दिड वर्षांचा नर आहे. तो रस्ता ओलांडत असताना वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. यासोबतच अधिक तपास व आवश्यक नोंदी वन विभागाच्या चिंचपाडा वनक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांच्या कडून करण्यात येत आहेत.
धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील जंगल भागात वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळी बसवण्यात आली असली, तरी विसरवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची हालचाल वाढली आहे. कन्हाळा, बालहाट, बालआमराई आणि परिसरातील इतर गावांजवळ शेतात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे, जे अत्यंत भीतीदायक आहे.स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, मानव आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली आहे.वन विभागाने वाहनचालकांना या भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नवापूर तालुक्यात विसरवाडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू; वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता..! नवापूर तालुक्यात विसरवाडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू; वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता..!
आधुनिक केसरी न्यूज चंद्रशेखर अहिरराव  धुळे- सुरत : राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल राहुल समोर एका बिबट्याचा...
दादुलगाव येथे भिषण अपघात ; दोघे गंभीर जखमी,संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..!
धुळ्यातील विश्राम गृहात सापडले कोट्यावधींची घाबड..!
५ किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढत चंद्रपूरकरांनी केला भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम
कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त