'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश

लोकप्रतिनिधी सक्रिय झाले, प्रशासन नरमले तोडगा निघण्याची शक्यता

'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीद्वारे आज रविवार दिनांक 11 मे  2025 रोजी 7.00 वाजता रामबाग मैदानावर बांधकाम विभागाने खोदलेल्या खड्ड्यात महापंचायत आयोजीत केली होती.या  महापंचायतीला शहरातील खेळाडु,युवक, विविध संघटना-संस्था व योगा ग्रुपचे प्रतिनिधी,महिला-मुले व सर्वसामान्य नागरिक यांनी उदंड प्रतिसाद दिला. जवळपास 500 नागरिकांनी या महापंचायत मध्ये सहभाग घेतला. यावेळी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा,पर्यावरण व आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महापंचायतीमध्ये एकूण 8 ठरावांचे वाचन करण्यात आले व हात वर करून आवाजी मतदानाने त्या ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

रविवारी सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधी सक्रिय झाले

रामबाग मैदानावर इमारतीच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला.अनेकांनी लोकप्रतिनिधी पर्यंत आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न केला. परंतु नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या यी मैदानावर भला मोठा खड्डा होईपर्यंत कोणीही जनतेच्या आवाजाची दखल घेतली नाही.या भागाचे माजी नगरसेवक राजेश अडूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. भरत गुप्ता, प्रतिमाताई ठाकूर, डॉ. चेतन खुटेमाटे यांनी क्रिकेट खेळाडूंच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पर्यंत भावना पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इमारतीचे काम सुरूच होते.
अखेर काही नागरिकांनी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांना मैदानावर बोलावले. भला मोठा खड्डा पाहून देशमुख संतापले, त्यांनी  तडकाफडकी इमारतीचे काम बंद पाडले. सर्वांनी एकत्रित येऊन रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीची स्थापना केली व या आंदोलनाला दिशा मिळाली.
      आज महापंचायत संपन्न झाल्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी शहरात पसरली.माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवार सुट्टीचा दिवस असताना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली. दोन कक्षात दोन बैठकी संपन्न झाल्या. दोन्ही बैठकींना जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली, काम थांबविण्याचे निर्देश दिले. मुनगंटीवार यांनी शहरातील विविध भागात मैदाने विकसित करण्याची व रामबाग मैदानावर क्रिकेट तसेच फुटबॉल साठी क्रीडांगण आरक्षित करण्याची सूचना केली. तूर्तास जिल्हा प्रशासनाने रामबाग मैदानावर  इमारतीचे बांधकाम करण्यापासून माघार घेतली आहे. तातडीने खड्डा बुजवून देण्याची हमी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महापंचायतीने घेतलेल्या जवळपास सर्वच ठरावांना जिल्हा प्रशासनाने तत्वतः स्वीकारले आहे.

महापंचायतीमध्ये मंजूर ठराव

रामबाग मैदानावर इमारत बांधकामास विरोध आहे,मैदानावर केलेला खड्डा  बुजवून मैदान पूर्ववत करावे, चंद्रपूर सारख्या प्रदूषित शहरातील कोणत्याही मैदान किंवा नैसर्गिक ठिकाणाची हत्या करून विकास करण्याला विरोध आहे, रामबाग मैदान हे गोंडराजे रामशहा यांनी निर्माण केलेल्या रामाळा तलावात असून मैदानाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार नागपूरचे राजे भोसले यांचा महाल असल्याने या परिसराचे जतन करावे, शहरातील विविध भागात 5 ते 6 मोठी मैदाने तयार करण्यात यावी, जुन्या इमारत परिसरात व जुबिली हायस्कूलच्या मागे सर्वशिक्षा अभियान कार्यालयाला लागून जिल्हा परिषदेच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम करावे, चंद्रपूरचे छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेश नायडू यांनी महापंचायतीत पुरस्कार शासनाला परत करण्याचा इशारा दिला याची दखल घ्यावी व सर्व मंजूर ठरावांच्या अनुषंगाने तातडीने उचित कार्यवाही करावी असे ठराव या महापंचायतीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
आधुनिक केसरी न्यूज चंद्रकांत पतरंगे गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी माओवादी चळवळीला मोठा...
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार
वैनगंगेत बुडालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सांत्वन
रामबाग मैदान वाचवले नागरिकांच्या आवाजाला मिळाले यश :आ.किशोरभाऊ जोरगेवार