चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : दि.1 जून राज्य शासन व युवक सेवा संचालनालय,  पुणे यांच्या 'खेलो इंडिया' उपक्रमांतर्गत आणि साई, मुंबईच्या निर्देशानुसार 'संडे ऑन सायकल' उपक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. या अंतर्गत आज (दि. 1) सकाळी  चंद्रपूर शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, वरिष्ठ लिपिक रंजना शेवतकर व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुरुवात केली.

आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश

सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार असून यामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, आरोग्यवृद्धी आणि साहसवृत्तीचा विकास साधता येतो. ‘फिटनेस का डोज, अर्धा तास रोज’ या घोषवाक्याखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या या रॅलीत जनजागृतीपर घोषणांचा समावेश होता. या यशस्वी उपक्रमासाठी क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदीप उईके, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड व मानधन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. खेलो इंडिया चे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन.  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे शहर च्या वतीने निषेध आंदोलन. 
आधुनिक केसरी न्यूज रोहित दळवी  पुणे : दि.28 वार्तांकन करत असताना काळेपडळ हडपसर परिसरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पुणे...
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक
अकोला आणि हिंगोलीतील प्रहार,वंचित आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान; शिवसैनिकांचा सेवाभाव 
श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद तब्बल ५.५३ लाख व्ह्युव 
वरोडा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग ; शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी काँग्रेसचे राजू महाजन यांची फिल्डिंग
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी साताऱ्याचा मानसन्मान ठेवला